
पाकिस्तानने शुक्रवारी पुन्हा एकदा गोळीबारासह भारतातील २०पेक्षा जास्त शहरांमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे हे प्रयत्न भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमनं हाणून पाडले. दरम्यान, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी युद्धाशिवाय कोणता पर्याय उरला नसल्याचं विधान केलंय. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटलं की, आमच्याकडे आता युद्धाशिवाय इतर कोणताही पर्याय राहिला नाहीय. भारताला आम्ही जशास तसं उत्तर देऊ.