पाकिस्तानला सतावतेय सर्जिकल स्टाईकची भीती

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 9 December 2020

2016 मध्ये भारताने उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळे उद्धवस्त केली होती. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

पाकिस्तानला आता पुन्हा एकदा सर्जिक स्ट्राइकची भीती सतावत आहे. या धास्तीपोटी पाकिस्तानने आपल्या सैन्याला सतर्क राहण्याचा इशारा दिल्याचे वृत्त आहे. इम्रान सरकारने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली नसली तरी स्थानिक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानमधील जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, लडाख आणि डोकलाम प्रकरण आणि शेतकरी आंदोलन यावरुन लक्ष्य हटवण्यासाठी भारताकडून सीमारेषेवर हल्ला होऊ शकतो, असे इम्रान सरकारला वाटत आहे.

ट्रम्प आणि एलियन्सची युती? इस्त्राईलच्या माजी अंतराळ प्रमुखांचा धक्कादायक दावा

2016 मध्ये भारताने उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळे उद्धवस्त केली होती. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारताने बालकोट येथील दहशतवादी तळे उद्धवस्त केली होती. दोन्ही हल्ल्यांची पाकिस्तान लष्कराला जराही कल्पना नव्हती.

- पॅसिफिकमध्ये चीनला शह देण्यासाठी अमेरिकेची मोठी तरतूद  

पाकिस्तान नेहमीच कोणत्यातही मुद्याच्या आडून भारतात दहशतवादी कारवायाला प्रोत्साहन देत असते, असे देखील काही अभ्यासकांचे मत आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये अशांती निर्माण करण्याचे नापाक इरादे पाकिस्तान सरकार आणि लष्करासह आयएसआयकडून सुरु आहेत. याकडे दुर्लक्ष व्हावे या उद्देशाने पाकिस्तान फेक बातम्या पसरवत असल्याचेही बोलले जात आहे.  

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan fears one more surgical strike by india army on alert says pak media