esakal | कुलभूषण जाधव सुटणार? भारतीय अधिकारी पोहोचला त्यांच्यापर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

कुलभूषण जाधव सुटणार? भारतीय अधिकारी पोहोचला त्यांच्यापर्यंत

इस्लामाबाद : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अखेर ‘कौन्सेलर ऍक्‍सेस' दिला आहे. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातील उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये आज जवळपास दोन तास चर्चा होणार आहे.

कुलभूषण जाधव सुटणार? भारतीय अधिकारी पोहोचला त्यांच्यापर्यंत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अखेर ‘कौन्सेलर ऍक्‍सेस' दिला आहे. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातील उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये आज जवळपास दोन तास चर्चा होणार आहे. काल (रविवार, १ सप्टेंबर) अहलुवालिया यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज, अहलुवालिया आणि जाधव यांची भेट होत आहे.

महाराष्ट्राच्या या दोन महिलांनी संसदेत उमटविला कामाचा ठसा

अभिनंदन, अभिनंदन! पुन्हा झेपावले 'त्या' दिशेने

भारताने धुडकावल्या होत्या अटी
किस्तानने कुलभूषण जाधव यांना ‘कौन्सेलर ऍक्‍सेस' देण्यासंदर्भात गेल्या महिन्यात १ ऑगस्टला प्रस्ताव दिला होता. भारताने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मुळात भारताने कोणत्याही अटीशिवाय ‘कौन्सेलर ऍक्‍सेस'ची अपेक्षा व्यक्त केली होती. पाकिस्तानने ‘कौन्सेलर ऍक्‍सेस' दिला होता. पण, भारतीय अधिकाऱ्यासोबत एक पाकिस्तानी अधिकारी सोबत असेल, अशी अट घातली होती. भारताने ही अट अमान्य केली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल आणि व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेट घेण्याची परवानगी देण्यात आली, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहंमद फैसल यांनी दिली. फैजल यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. जाधव यांच्यावर पाकिस्तानने हेरगिरीचा केल्याचा आरोप केला ठेवला आहे. भारताच्या नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना इराणमधून अटक करण्यात आल्याचे भा1रताचे म्हणणे आहे. इराणमध्ये व्यापाराच्या निमित्ताने गेलेल्या कुलभूषण यांना इराण-अफगाणिस्तान सीमेवर अटक झाल्याचे भारताचे म्हणणे आहे.

सत्ता आहे म्हणून तिकडे जाणे योग्य नाही : उदयनराजे भोसले

आंतरराष्ट्रीय न्यायालयातून भारताला दिलासा
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात हेरगिरी केल्याच्या आरोपावरून ११ एप्रिल २०१७ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. पण, भारताने त्याला आक्षेप नोंदवत आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. पाकिस्तान व्हिएन्ना कराराचा भंग करत असल्याचे भारताचे म्हणणे होते. आंतरराष्ट्रीय न्यायलयात दोन वर्षे दोन महिने यावर सुनावणी झाली. त्यानंतर १८ जुलै २०१८ रोजी १६ सदस्यांच्या खंडपीठातील १५ सदस्यांनी भारताच्या बाजूने निकाल देत कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली. दुसऱ्या देशातील अधिकारी आणि सैनिक यांना पकडल्यानंतर पाकिस्तानने व्हिएन्ना करारानुसार हे पाऊल उचलता कामा नये, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केले.

loading image
go to top