esakal | महाराष्ट्राच्या 'या' दोन महिला सदस्यांनी लोकसभेत उमटविला ठसा
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राच्या 'या' दोन महिला सदस्यांनी लोकसभेत उमटविला ठसा

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील चर्चांमध्ये भाग घेऊन तसेच सभागृहात प्रश्न उपस्थित करून पुन्हा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी १६व्या लोकसभेमध्येही अशीच कामगिरी केली होती.

महाराष्ट्राच्या 'या' दोन महिला सदस्यांनी लोकसभेत उमटविला ठसा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशाच्या १७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील चर्चांमध्ये भाग घेऊन तसेच सभागृहात प्रश्न उपस्थित करून पुन्हा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी १६व्या लोकसभेमध्येही अशीच कामगिरी केली होती. त्यांना संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्यासोबत भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांची कामगिरी उल्लेखनीय झाली असून, महाराष्ट्राच्या दोन कन्या संसदेतील कामकाजात आघाडीवर आहेत.

अजित पवार म्हणाले, ‘आता चित्र लवकर बदलेल’

कलम ३७०वर शहांनी दिलेली माहिती खोटी; सुप्रिया सुळेंचा दावा​

सुप्रिया सुळेंचा कामाच धडाका
लोकसभा सदस्य म्हणून, तिसऱ्यांदा काम करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी कायमच संसदेतील कामकाजात आपला ठसा उमटवला आहे. यंदाच्या लोकसभेत पहिल्या सत्रात त्यांनी ३४ चर्चांमध्ये सक्रीय चर्चांमध्ये भाग घेतला होता. त्यांनी सभागृहात चार वैयक्तिक विधेयके सादर केली तर, एकूण १०९ वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते. गेल्या लोकसभेत त्यांनी अशाच कर्तृत्वाने संसद रत्नचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला होता. सुप्रिया सुळे यांनी यावेळीही संसदेत आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे.

विधानसभा २०१९: आता वंचितचाही फॉर्म्युला ठरला

डॉ. गावितही आघाडीवर
सुप्रिया सुळे यांच्यापाठोपाठ भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांचीही संसद सभागृहातील कामगिरी उल्लेखनीय आहे. गावित यांनी यंदाच्या पहिल्या सत्रात १२ चर्चांमध्ये सभाग घेतला असून, त्यांनी १०६ प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी सभागृहात कोणतेही वैयक्तिक विधेयक मांडलेले नाही. डॉ. गावित या दुसऱ्यांदा लोकसभा सदस्य झाल्या असून, यापूर्वी त्यांनाही संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

आचारसंहिता जाहीर करण्याची नेत्यांनाच घाई; मंत्र्यांनीच सांगितली तारीख

नव्या सदस्यांचा उत्साह
यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या सत्रातील अर्थसंकल्पी अधिवेशनात अर्थसंकल्पाची विधेयके वगळता इतर ३८ विधेयके सादर करण्यात आली. त्यातील २८ विधेयकांना सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांत संसदेच्या कामकाजात कमी वेळात मंजूर झालेली ही सर्वाधिक विधेयके आहेत. यंदाच्या १७व्या लोकसभेमध्ये २६५ सदस्य पहिल्यांदा निवडून आले आहेत. पण, त्यांनी कामकाजात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. लोकसभेत महिला सदस्यांची संख्या ७८ आहे. पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांपैकी ९४ टक्के सदस्यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे. लोकसभेच्या १६व्या सभागृहातील पहिल्या सत्रात, पहिल्यांदा सदस्या झालेल्यांपैकी ८२ टक्के सदस्यांनी चर्चांमध्ये सहभाग नोंदवला होता. यंदा यात वाढ झाल्याचे दिसत आहे.

loading image
go to top