esakal | पाकिस्तानच्या पोटात दुखलं, कोंडी करण्यासाठी लिहिलं ICC ला पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan, PCB,  t20 world cup in india, government of india, visa, icc, uae

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा  अन्य देशांत  घेण्याचा विचार करावा, असे पत्र एहसान मनी यांनी आयसीसीला लिहिले आहे.    

पाकिस्तानच्या पोटात दुखलं, कोंडी करण्यासाठी लिहिलं ICC ला पत्र

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

यंदाच्या वर्षी आयसीसी टी-20 वर्ल्डकपची मेजवाणी भारत करणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारत सरकारवर अविश्वासाची भावना व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी व्हिसासंदर्भात शंका उपस्थितीत केली असून यांसदर्भात त्यांनी थेट आयसीसीला पत्र लिहिले आहे. मार्चच्या अखेरीपर्यंत भारत सरकारने क्रिकेट चाहते आणि पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले नाही तर आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा  अन्य देशांत  घेण्याचा विचार करावा, असे पत्र एहसान मनी यांनी आयसीसीला लिहिले आहे.    

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ (ICC) स्पर्धेसंदर्भातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये होणाऱ्या टी-20 स्पर्धेसंदर्भात तेढ निर्माण झाला तर UAE मध्ये स्पर्धा घेण्याचा दुसरा पर्यायही आयसीसीने खुला ठेवला आहे. या वर्षी होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद हे ऑस्ट्रेलियाला मिळाले होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे भारताला मेजवाणीची संधी मिळाली आहे.

कोळसा तस्करी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; अभिषेक बॅनर्जी यांच्या थेट घरात पोहोचली टीम

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाचा दोन्ही देशाच्या क्रिकेट संबंधावरही परिणाम झाला आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही देशांतील द्विपक्षीय मालिका बंद असून आयसीसीच्या स्पर्धेतच दोन्ही संघ एकमेकांविरुद्द खेळताना दिसते. यंदाच्या वर्षी भारतात स्पर्धा नियोजित असल्यामुळे पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. भारत सरकार पाकिस्तानी चाहते आणि पत्रकारांना व्हिसा देणार नाही, अशी भावना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी आयसीसीला लिहिलेल्या पत्रातून बोलून दाखवली आहे. यासंदर्भात भारत सरकारची भूमिका नेमकी काय ? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पेट्रोल-डिझेलच्या 'शंभरी'वर सीतारमण म्हणाल्या, 'माझं उत्तर तुम्हाला पटणार नाही'

आम्हाला डिसेंबर 2020 पर्यंत क्रिकेट चाहते आणि पत्रकार यांच्या व्हिसासंदर्भात लेखी आश्वासन मिळेल, असे आयसीसीने सांगितले होते. याचा आम्ही जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पाठपुरावाही केला. आता आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. मार्चच्या अखेरपर्यंत जर आम्हाला व्हिसासंदर्भात भारत सरकारने लिखित आश्वासन दिले नाही तर स्पर्धा युएईमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घ्यावा, असे एहसान मनी यांनी स्पष्ट केले आहे.