कॉरिडॉरच्या उद्‌घाटनात इम्रान खान यांनी उधळली मुक्ताफळे!

वृत्तसंस्था
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

सध्या काश्‍मीरमधील जनतेला प्राण्यांसारखे वागविले जात असल्याची मुक्ताफळे उधळताना काश्‍मिरातील निर्बंध लवकरात लवकर हटवावेत, अशी मागणी इम्रान यांनी केली. 

कर्तारपूर : ऐतिहासिक कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटन प्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्‍मीरचे तुणतुणे वाजविले. कार्यक्रमावेळी खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारताने काश्‍मीरमध्ये लागू केलेले सर्व निर्बंध हटवावेत, अशी मागणी केली. 

- Ayodhya Verdict : हिंदूंनी मशीद बांधण्यासाठी निधी द्यावा : रामदेव बाबा

इम्रान खान यांनी कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाच्या वेळी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या माझ्या पहिल्या भेटीच्या वेळी मी त्यांना काश्‍मीरचा मुद्दा लवकरात लवकर सोडवावा, अशी सूचना केली होती. मात्र, सध्या काश्‍मीरची परिस्थिती वाईट झाली असून, सध्या तेथील जनतेला नऊ लाख सैनिकांनी वेढलेले आहे.

सध्या काश्‍मीरमधील जनतेला प्राण्यांसारखे वागविले जात असल्याची मुक्ताफळे उधळताना काश्‍मिरातील निर्बंध लवकरात लवकर हटवावेत, अशी मागणी इम्रान यांनी केली. 

- Ayodhya Verdict : अयोध्या निकालानंतर मालेगावात काय प्रतिक्रिया?

काश्‍मीरचा प्रश्‍न सुटल्याशिवाय या उपखंडाचा विकास शक्‍य नाही. कारण, काश्‍मीर प्रश्‍नामुळे दोन्ही देशांमध्ये 70 वर्षांपासून द्वेष आहे. त्यामुळे काश्‍मीरमधील लोकांना भारताने न्याय मिळवून दिला पाहिजे. तेव्हाच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील, असेही ते या वेळी म्हणाले. 

- Ayodhya Verdict : अडवानी म्हणतात, 'मी देवाचे आभार मानतो'

नानकदेवांच्या समाधीस भेट देता येणार 

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांच्या अनुयायांसाठी कर्तारपूर कॉरिडॉरचे इम्रान यांनी उद्‌घाटन केले. या वेळी त्यांनी गुरू नानकदेव यांच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात असलेल्या समाधिस्थळाला भेट देण्याची परवानगी दिली. 

सविस्तर लेखांसाठी क्लिक करा esakal.com डाऊनलोड करा 'सकाळ'चे मोबाईल अॅप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan PM Imran Khan made statement about Jammu Kashmir at inauguration ceremony of Kartarpur Corridor