Viral Video: दंड मागितला म्हणून महिलेले थेट पोलिसाच्या अंगावर घातली कार, पाहा संतापजनक व्हिडिओ

Pakistan Toll Plaza: यावेळी एका युजरने कमेंट केली, "सरकारने या महिलेवर पूर्वनियोजित हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे माफी देऊ नये."
Pakistan Woman Runs Car over Police
Pakistan Woman Runs Car over PoliceEsakal

पाकिस्तानच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा, एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेने टोल प्लाझावर एका ट्रॅफिक पोलिसाला तिच्या कारने निर्दयपणे धडक दिली.

वृत्तानुसार, ही घटना इस्लामाबादमधील टोल प्लाझावर घडली, जिथे पोलिसांनी महिलेला थांबवले. मात्र, महिलेने एका अधिकाऱ्यावर आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर तेथे वादाची परिस्थिती निर्माण झाली.

पुढे या महिलेने पोलिसाला ‘जाहिल’ म्हणत गाडीसमोर उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला ओरडायला सुरुवात केली आणि उद्धटपणे त्याला बाजूला होण्यास सांगितले. जेव्हा पोलिसांनी यास नकार दिला तेव्हा महिलेने त्याला आपल्या कारने क्रूरपणे धडक दिली. (Pakistan Woman Runs Car over Police)

एका सोशल मीडिया युजरने चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये ती महिला अधिकाऱ्यांशी भांडताना आणि नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. पुढे पोलिसांच्या तावडीतून सुटून जाण्याच्या प्रयत्नात टोल प्लाझा बॅरिअर तोडून अधिकाऱ्यावर गाडी घालते. मात्र, पोलीस महिलेच्या गाडीचा यशस्वी पाठलाग करतात.

हा व्हिडिओ उर्दू कॅप्शनसह शेअर करण्यात आला आला आहे. त्यामध्ये म्हटले की, "ओव्हरस्पीडिंगसाठी कारवाई करणाऱ्या पोलिसांवर एका महिलेने कार चढवली."

Pakistan Woman Runs Car over Police
Tennessee Gun Bill : अमेरिकेचं चाललंय काय? आता शिक्षक-कर्मचाऱ्यांनाही शाळेत नेता येणार बंदूक; गोळीबाराच्या घटना वाढल्यामुळे आणला नवा कायदा

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला असला तरी ही घटना जानेवारी महिन्यात घडली होती. दरम्यान, महिलेला तिच्या गुन्ह्यासाठी नंतर अटक करण्यात आल्याची माहिती आहे. एक्सवर आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास 66 हजार युजर्सनी पाहिला आहे.

Pakistan Woman Runs Car over Police
जगातील उपासमारीचं संकट अधिक गडद! संयुक्त राष्ट्राचा ताजा अहवाल चिंतेत टाकणारा

यावेळी एका युजरने कमेंट केली, "सरकारने या महिलेवर पूर्वनियोजित हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे माफी देऊ नये."

"काही लोक गर्विष्ठतेचे प्रतीक आहेत; या व्यक्ती त्यांच्याकडे असलेले सर्व शिक्षण, अभिजातता आणि अमर्याद पैशामुळे चांगल्या होऊ शकत नाहीत," असे दुसऱ्या युजरने लिहिले.

दरम्यान घटनेविषयी बोलताना अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, महिला वेगात होती आणि दंड वसूल करण्यासाठी तिला टोल प्लाझा येथे थांबवण्यात आले. त्यावेळी आमच्या एका सहकाऱ्यावर या महिलेने गाडी घातली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com