esakal | Ayodhya Verdict : अयोध्या निकालामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखतंय!

बोलून बातमी शोधा

Ayodhya-Verdict

कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाच्या आनंददायक प्रसंगात लागलेल्या या निकालामुळे आपल्याला दुःख झाले आहे.

Ayodhya Verdict : अयोध्या निकालामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखतंय!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद : बहुप्रतीक्षित अयोध्या जमीन वादाच्या निकालावर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी आक्षेप नोंदविला आहे. 

कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाच्या आनंददायक प्रसंगात लागलेल्या या निकालामुळे आपल्याला दुःख झाले आहे. भारतातील मुस्लिम दबावाखाली असल्याचा आरोप करत या निर्णयामुळे दबाव आणखी वाढेल, असे मत नोंदविले. 

- Ayodhya Verdict : अयोध्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल; वादग्रस्त जमिनीवर मंदिरच!

अयोध्येच्या निकालाबाबत प्रतिक्रिया देत कुरेशी यांनी या निर्णयाबद्दल सविस्तर चर्चा केल्यानंतर पाकिस्तान आपली प्रतिक्रिया देईल, असे सांगितले. 

विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री फवाद हुसेन यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पंतप्रधानांचे विशेष सहायक फिरदौस आशिक अवान म्हणाले की, कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करून पाकिस्तान मानवी हक्काची हमी देत असताना भारतीय न्यायालयाने दिलेला निकाल समाधानकारक नाही. 

- Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा 

दरम्यान, पाकिस्तानच्या डॉन न्यूजने निकालासाठी आणखी काही दिवस थांबण्याची आवश्‍यकता बोलून दाखविली. 

- Ayodhya Verdict : हिंदूंनी मशीद बांधण्यासाठी निधी द्यावा : रामदेव बाबा