Alert : भारतावर दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता; अमेरिकेने दिला इशारा!

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

काश्‍मीर प्रश्‍नाबाबत चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा काहीसा राजनैतिक आणि राजकीय स्वरूपाचा आहे.

वॉशिंग्टन : जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्याने पाकिस्तानी दहशतवादी हे भारतावर हल्ला करू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

पाकिस्तानी पाठिंब्याच्या बळावर काही दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करू शकतात, पण या सगळ्या कारवायांना चीन पाठिंबा देईल, असे आम्हाला वाटत नाही, असे अमेरिकेच्या भारत प्रशांत सुरक्षाविषयक समितीचे सचिव रँडाल श्रीव्हर यांनी एका वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सांगितले. 

या वेळी उपस्थितांनी श्रीव्हर यांना चीनच्या पाकिस्तानी पाठिंब्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, काश्‍मीर प्रश्‍नाबाबत चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा काहीसा राजनैतिक आणि राजकीय स्वरूपाचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला असून, हाच मुद्दा संयुक्त राष्ट्र संघामध्ये मांडण्यावरून देखील पाकिस्तान आणि चीनमध्ये चर्चा झाली होती.

हे राजनैतिक पातळीवर ठीक आहे. पण, यापुढे जाऊन ते अधिक मदत करतील, असे वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान आणि चीनचे संबंध हे जुने असून, त्यांची भारताशी स्पर्धा आहे. भारताला मात्र चीनसोबत स्थिर संबंध हवे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- कपिलदेव यांचा दोन्ही पदांचा राजीनामा

- Vidhan Sabha 2019 : मनसेची दुसरी यादी जाहीर; 'या' महत्त्वाच्या नेत्याचे कापले तिकीट

- धक्कादायक ! इस्रोच्या वैज्ञानिकाची घरामध्ये घुसून हत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani terrorist groups might attack in India says United Stete