फायझरची लस ठरतेय प्रभावी

पीटीआय
Friday, 26 February 2021

विविध कंपन्यांनी तयार केलेल्या लशींचा उपयोग करून लसीकरण मोहिमा राबविल्या जात असून फायझर या अमेरिकी कंपनीने तयार केलेल्या लशीच्या परिणामकारकतेचे अहवाल समोर आले आहेत.

लशीची परिणामकारकता ९२ टक्के असल्याचा इस्त्राईलच्या अहवालात दावा
जेरुसलेम - विविध कंपन्यांनी तयार केलेल्या लशींचा उपयोग करून लसीकरण मोहिमा राबविल्या जात असून फायझर या अमेरिकी कंपनीने तयार केलेल्या लशीच्या परिणामकारकतेचे अहवाल समोर आले आहेत. आतापर्यंत इस्राईलमधील जवळपास पाच लाख लोकांना ही लस देण्यात आली असून एका डोसनंतरही कोरोना संसर्ग रोखण्यात किंवा या संसर्गामुळे होणारे मृत्यू रोखण्यात ती यशस्वी ठरत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

PUB G mobile 2 पुढच्या आठवड्यात होणार लॉन्च?; भारतात सुरु होण्याची शक्यता धूसर

इस्राईलमधील लसीकरणाचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ही लस सर्व वयोगटांमध्ये प्रभावी ठरत आहे. लसीचे दोन डोस दिल्यावर परिणामकारकता ९२ टक्के असून एक डोस दिल्यावर लस ६२ टक्के प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. युवकांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांनाही लशीमुळे कोणताही त्रास झाला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. फायझर आणि जर्मनीतील बायोएनटेक या कंपनीने तयार केलेली ही लस दोन डोसच्या माध्यमातून दिली जाते. 

जागतिक आरोग्य संघटनेनेही आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेल्या ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका लशीचा जगभरातील वापर वाढला आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीतर्फे या लशीचे उत्पादन होत आहे. ॲस्ट्राझेनेकासह नोव्हाव्हॅक्स या कंपनीनेही सीरमच्या साह्याने आणखी लस उत्पादन करण्याची तयारी दर्शविली आहे. 

गरीबीविरोधात चीनचा ऐतिहासिक विजय; 77 कोटी गरीबांना काढलं दारीद्र्यातून बाहेर

जॉन्सन अँड जॉन्सनही उपयुक्त
वॉशिंग्टन :
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने तयार केलेल्या लशीचा एक डोसही कोरोनापासून संरक्षण देऊ शकतो, असा निष्कर्ष अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने विश्‍लेषणानंतर काढला आहे. यामुळे या लशीला अमेरिकेत लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सध्या लशींचे दोन डोस ठराविक दिवसांच्या अंतराने देणे आवश्‍यक आहे. मात्र, जॉन्सन अँड जॉन्सनचा एकच डोस आवश्‍यक असल्याने यास मान्यता मिळाल्यास लसीकरणाचा वेग वाढू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pfizer vaccine is effective