बापरे! पायलटच विमानाला लटकला 23 हजार फुटांवर आणि तरीही जगला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

हा कोणत्यातरी ऍक्शन फिल्ममधील थ्रिलींग सीन वाटतो. पण असं नाहीये. हे घडलंय प्रत्यक्षात!

तुम्ही विमान प्रवास केला असेल. प्रत्येकालाच एकदा ना एकदा विमान प्रवास करण्याची इच्छा असते. सध्या अशाच एका विमानातील धक्कादायक घटना आणि त्यासंबधीचे फोटो व्हायरल होत आहेत. एका ट्विटर युझरने याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. 

हेही वाचा - लहानपणी रामायण-महाभारतातील कथा ऐकायचो, ओबामांनी उघड केलं गुपित

विमान हवेमध्ये 23 हजार फूट उंचीवर आहे. त्याचा वेग 800 किमी प्रति तास आहे. आणि अचानकच अशी काही घटना घडते ज्यामुळे अक्षरश: तुमचे धाबे दणाणतात. अचानकच डाव्याबाजूची खिडकी तूटते आणि त्या खिडकीचा दरवाजाच बिजागरीपासून तुटून वेगळा होतो. यासोबतच हवेच्या दाबामुळे विमानाचे मुख्य पायलट या तुटलेल्या खिडकीतून बाहेरच्या बाजूला खेचले जातात. त्या पायलटचे पाय सुदैवाने जसेतसे खिडकीला अडकून राहतात. हवेच्या तीव्र दबावामुळे खिडकीचा दरवाजादेखील तुटून निखळला आहे. विमानातील सर्व 81 प्रवासी आणि क्रू मेंबर ही घटना पाहताहेत आणि त्या सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली आहे. 

हेही वाचा - रुग्णासाठी डॉक्टर झाला 'बॅटमॅन'

हा कोणत्यातरी ऍक्शन फिल्ममधील थ्रिलींग सीन वाटतो. पण असं नाहीये. हे घडलंय प्रत्यक्षात! 10 जून, 1990 साली ब्रिटीश एअरवेजच्या एका फ्लाईट 5390 मध्ये असं घडलं होतं. हे विमान बर्मिंघम ते मलागासाठी प्रवास करत होतं. उड्डाणानंतर जवळपास 20 मिनिटांनीच प्रवाशांनी कॉकपिटमध्ये एक मोठ्या धमाक्याचा आवाज ऐकला. यासोबतच विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन टिमोथी लँकस्टर हे तुटलेल्या खिडकीतून बाहेर लटकत होते. 

ते पूर्णत: बाहेर फेकले जाणारच होते मात्र क्रू मेंबर ऑग्डेन यांनी शिताफिने त्यांना पकडले. त्यांचे पाय त्यांनी कसेबसे पकडून ठेवले. बाहेरील हवेच्या दबावामुळे ते देखील उडून बाहेर पडणार होते मात्र या पासून वाचण्यासाठी त्यांनी आपले पाय एका खुर्चीत अडकवले. आता ते मुख्य पायलटचे पाय घट्ट पकडून स्वत: आपले पाय दुसऱ्या एका खुर्चीमध्ये अडकवलेल्या अवस्थेत होते. कसेबसे विमान लँड करण्यात आले आणि मग सगळ्यांचा जीव वाचवण्यात आला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Pilot Sucked Out Of Plane At 23,000ft Survived