
पुतीन यांच्यावर होणार कॅन्सर सर्जरी; माजी गुप्तहेराकडे सोपवणार कारभार
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यावर लवकरच कॅन्सरसंबंधीची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळं रशियाचा कारभार ते तात्पुरत्या स्वरुपात माजी गुप्तहेराकडं सोपवणार आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे. (Putin to undergo cancer surgery hand over power to ex spy chief)
हेही वाचा: कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना स्पष्ट निर्देश
गेल्या महिन्यात संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्या भेटीदरम्यान पुतीन यांनी बैठकीच्या ठिकाणचा एक टेबल घट्ट पकडून ठेवलेला दिसले होते. या घटनेमुळं त्यांच्या प्रकृतीबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. या शंका अखेर ठरल्या असून डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. रशियाच्या माजी परराष्ट्र गुप्तचर सेवेतील अधिकाऱ्यांकडून टेलिग्राम चॅनेल चालवला जातो. या चॅनेलवर यासंदर्भात माहिती शेअर करण्यत आली आहे.
हेही वाचा: ...अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचं दुर्दैव; राणेंचं पवारांवर टिकास्त्र
पुतीन यांना कॅन्सरची लागण झाल्याची अफवा पसरली होती. तसेच त्यांना इतरही गंभीर स्वरुपाचे आजार असल्याची चर्चा सुरु होती. यामध्ये त्यांना पार्किन्सन्स आजार असल्याचंही बोललं जात होतं. दरम्यान, पुतीन यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, त्यांचा अत्यंत विश्वासू सहकारी कोण असेल तर ते सिक्युरिटी काऊन्सिलचे प्रमुख आणि फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे माजी कमांडर निकोलाई पत्रुशेव्ह आहेत. तसेच पुतीन यांनी असंही म्हटलं होत की, जर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली तर देशाचा प्रत्यक्ष कारभार हा तात्पुरत्या स्वरुपात पत्रुशेव्ह यांच्याकडे सोपवण्यात येईल.
हेही वाचा: ताजमहालमध्ये पूजा करण्यासाठी निघाले अयोध्येतील महंत!
दरम्यान, पत्रुशेव्ह यांना अनेकांचा विरोध असून ते व्हिलन असून पुतीन यांच्यासाठी ते पर्याय असू शकत नाहीत. पुतीन यांच्यापेक्षा ते खूपच कपटी व्यक्तीमत्व असून जर ते सत्तेत आले तर रशियाच्या अडचणीत दुपट्टीनं वाढ होईल असं टेलिग्राम चॅनेलच्या मालकानं म्हटलं आहे.
Web Title: Putin To Undergo Cancer Surgery Hand Over Power To Ex Spy Chief Nikolai Patrushev
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..