General Knowledge : भारताचा असा एक शेजारी देश, जिथं मुस्लीम बांधव आहे, पण एकही मशीद नाही...

या देशात तुम्हाला फक्त बौद्ध मंदिरे आणि मठ दिसून येतील
General Knowledge
General Knowledgeesakal

General Knowledge : भारताचे शेजारी देश आपल्या सगळ्यांनाच माहितीये. मात्र भारताचा असा एक अनोखा शेजरी देश तुम्हाला माहितीये काय जिथे मुस्लीम धर्मीय आणि अन्य धर्माचे लोकही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र इथे ना मशीद आहे आणखी कुठली मंदिरे. या देशात तुम्हाला फक्त बौद्ध मंदिरे आणि मठ दिसून येतील. तेव्हा हा अनोखा देश कोणता आणि येथे मशिद किंवा अन्य मंदिरे का नाहीत जाणून घेऊया.

या देशात अनेक मुस्लीन बांधवांना मशिदी बांधण्यासाठी मागणी केली मात्र त्याला सरकारकडून मान्यता मिळाली नाही. या लहानशा देशाचं नाव आहे भूटान. या देशाची लोकसंख्या जवळपास 7.5 लाख एवढी आहे. येथील 84.3 टक्के लोकसंख्या बौद्ध धर्म पाळणारी आणि मानणारी आहे. त्यामुळे येथे भरपूर बौद्ध मंदिरे आणि मठ आहे.

बौंद्ध धर्मियांनंतर लोकसंख्येचा मोठा वर्ग हिंदू आहे. त्यांचीही काही मंदिरे आणि धर्मस्थळं येथे दिसून येतील. काही वर्षाआधी भूटानचा राजा राजधानी थिंफूने फार सुंदर अशा हिंदू मंदिराचं निर्माण केलं आहे. भूटानमध्ये मुस्लीन धर्मियांची लोकसंख्या केवळ 1 टक्के आहे.

भूटानच्या लोकसंख्येचा आणि क्षेत्रफळाचा विचार करता हा देश भारतातील सगळ्यात छोटे राज्य गोवा याच्या पाच भागांतील एका भागाएवढे आहे. मात्र येथील लोकसंख्या गोव्याच्या लोकसंख्येच्या दुप्पट म्हणजेच 14 लाख आहे. भारतात केरळ हे एक असे राज्य आहे जे 38,863 स्केअर किमी क्षेत्रफळात पसरलेले आहे. हे क्षेत्रफळ भूटान देशाऐवढे आहे. मात्र केरळ राज्याची लोकसंख्या 3.46 कोटी एवढी म्हणजेच भूटान देशाच्या 450 पटीने जास्त आहे.

General Knowledge
Bhutan - India Relations: भूतानच्या पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याचे डॅमेज कंट्रोल भूतानचे राजे करणार?

भूटानमध्ये मुस्लीम बांधवांची संख्या जवळपास पाच ते सात लाखाच्या घरात आहे. हे बांधव येथे दीर्घकाळापासून राहात असले तरी त्यांची मशिद बांधण्याची मागणी त्यांनी स्विकारलेली नाही. तसेच क्रिश्चन बांधवही येथे बऱ्याच वर्षापासून स्थायिक आहेत मात्र त्यांनासुद्धा येथे राहाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com