Rishi Sunak : यांच्यासमोरील 5 आव्हानं जी त्यांना यूकेचा पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकतात.

बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या राजीनाम्यानंतर 42 वर्षीय ऋषी सुनक यांची ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान होण्याची शक्यता वाढली आहे.
Rishi Sunak
Rishi Sunakसकाळ डिजिटल टीम

इंडो-ब्रिटिश वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak ) यांनी ब्रिटनमधील (UK) सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नेता आणि पुढचे ब्रिटनचे पंतप्रधान (नेक्स्ट पीएम) या पदासाठी आपल्या नावाचा दावा मांडला आहे. बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या राजीनाम्यानंतर 42 वर्षीय ऋषी सुनक यांची ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान होण्याची शक्यता वाढली आहे. पण ऋषी सुनक यांचा पंतप्रधान पदापर्यंत पोहचण्यासाठी मार्ग देखील कठीण आहे हेही तितकेचं खरे आहे.

1) महागाईने 40 वर्षांचा विक्रम मोडला

जेव्हा ऋषी सुनक हे ब्रिटनमध्ये अर्थमंत्री होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळात राहणीमानाच्या खर्चात आणि वीज बिलात लक्षणीय वाढ झाली. द गार्डियनच्या मते, ब्रिटनमधील चलनवाढ ही सध्या 40 वर्षांतील सर्वोच्च दरावर असून ती 11% वर पोहोचली आहे. ब्रिटनमधील जनता आणि व्यापारी आधीच करांच्या दबावाखाली आहेत आणि अर्थमंत्री म्हणून ऋषी सुनक हे कराचा बोजा कमी करण्यास तयार नव्हते कारण ऋषी सुनक यांच्या मते, कर कमी केल्यास अर्थव्यवस्थेला हानी पोहोचेल. पण त्यांच्या या मतावर बरीच टीका झाली होती. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यामध्ये ऋषी सुनक वगळता इतर जवळपास सर्वच नेते हे व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहकांसाठी कर कमी करण्याविषयी सकारात्मक बोलत आहेत. त्यामुळे ऋषी सुनक यांच्यासाठी राजकीय वातावरण कठीण होऊ शकते.

Rishi Sunak
ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे ऋषी सुनक आहेत तरी कोण?

2) ब्रिटनमधील 30 वर्षांतील सर्वात मोठा रेल्वे संप

या वर्षी जूनच्या शेवटी, ब्रिटनमध्ये गेल्या 30 वर्षांतील सर्वात मोठा रेल्वे संप झाला. ब्रिटनमधील हजारो रेल्वे कर्मचारी हे आपल्या पगारात किमान 7% पगारवाढीची मागणी करत होते. पण सरकारने ही मागणी मान्य केली नाही. आपली मागणी पूर्ण न केल्यामुळे तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केला. या संपादरम्यान मग इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समधील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने त्यावेळी प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. या संपापूर्वी सरकार आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एक संवाद झाला होता. पण तो संवाद अयशस्वी ठरला. त्यावेळी रेल्वे युनियनचे सरचिटणीस माईक लिंच यांनी थेट तत्कालीन अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर आरोप केले होते. बीबीसीच्या बातमीनुसार, ते म्हणाले होते, "आम्हाला समजले आहे की या सरकारचे हात बांधलेले आहेत आणि ऋषी सुनक हे रेल्वेच्या समस्यांना जबाबदार आहेत." हा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसून रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी व्होट बँक आहे.

Rishi Sunak
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव यूकेच्या पंतप्रधानपदासाठी चर्चेत

3) कामगार वर्गाबद्दल केलेली टिप्पणी व्हायरल झाली तेव्हा...

अलीकडेच ऋषी सुनक यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये 2001 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ऋषी सुनक म्हणताना दिसत आहेत की, ब्रिटनमधील उच्च आणि श्रीमंत कुटुंबातील लोकच माझे मित्र आहेत. पण माझे कामगार वर्गात मित्र नाहीत. ही 7 सेकंदाची क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे ऋषी यांची जिंकण्याची शक्यता धुळीस मिळू शकते.

4) पत्नीची नॉन डोमिसाईल कर स्थिती

ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती ही इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ती अनेक वर्षांपासून यूकेमध्येच राहते. ब्रिटनमध्ये त्यांचे बऱ्यापैकी उत्पन्न आहे पण अक्षता ब्रिटिश नागरिकांइतके कर्ज फेडत नाहीत. याचे कारण म्हणजे अक्षता मूर्ती यांनी आतापर्यंत तिचे भारताचे नागरिकत्व कायम ठेवले असून त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व घेतलेले नाही. समीक्षकांचे म्हणणे असे आहे की, ऋषी सुनक यांच्या पत्नीने मोठा कर भरू नये म्हणून आतापर्यंत नॉन-डोमेस्टिक टॅक्सचा दर्जा कायम ठेवला आहे. यापूर्वीही यावरून बराच वाद झाला होता.

Rishi Sunak
भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनू शकतात ब्रिटनचे पंतप्रधान

5) बोरिस जॉन्सनसह पार्टीगेट मध्ये नाव आले

बोरिस जॉन्सन सरकारमध्ये ऋषी सुनक हे अर्थमंत्री होते. बोरिस जॉन्सन जेव्हा कोरोनाच्या काळात पंतप्रधानांच्या निवासस्थानी नियम मोडणाऱ्या पार्टीच्या प्रकरणात अडकले होते, तेव्हा ऋषी सुनक यांचेही नाव या घोटाळ्यात आले होते. यासोबतच त्यांना कोरोनाच्या काळात नियम मोडल्याबद्दल दंडही भरावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com