
Rishi Sunak: जावईबापूंनी केलं सुधा मुर्ती आणि नारायण मुर्तींचं कौतुक
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक हे भारतीय नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक तिसऱ्या फेरीत देखील आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा प्रमुख दावेदार मानलं जातंय.ऋषी सुनक बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते. १८ जुलैला एका टिव्ही चॅनेलला मुलाखतीत ऋषी सुनक यांनी आपल्या सासू -सासऱ्यांचं कौतुक केलंय. ( Rishi Sunak says he is proud his in-laws)
ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता ह्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती आणि सहसंस्थापक व लेखिका सुधा मुर्ती यांची मुलगी आहे. हे कुटुंब बऱ्याचदा चर्चेत असतं. ऋषी सुनक यांच्यावरही मध्यंतरी घोटाळ्याचे आरोप झाले होते. तर अक्षता मुर्ती या ब्रिटनच्या नागरिक नाहीत. त्यांनी भारतीय नागरिकत्व कायम ठेवलंय. हे सगळं त्यांनी टॅक्स वाचविण्यासाठी केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.
हेही वाचा: भारतीय वंशाचे ऋषी सुनक मजबूत स्थितीत, तिसऱ्या फेरीत 115 मतांसह आघाडीवर
मात्र आता ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. यानिमित्तानेच त्यांची मुलाखत झाली. यात त्यांनी आपल्या सासू-सासऱ्याचं कौतुक केलंय. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये इन्फोसिस ही जागतिक पातळीवर आघाडीची कंपनी आहे. तर इन्फोसिसच्या सहसंस्थापक आणि सुप्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती हे भारतातलं एक लोकप्रिय असं जोडपं आहे.
हेही वाचा: Rishi Sunak : यांच्यासमोरील 5 आव्हानं जी त्यांना यूकेचा पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकतात.
ITV ला दिलेल्या मुलाखतीत ऋषी सुनक यांनी आपल्या सासू -सासऱ्यांचं कौतुक करताना, माझ्या सासू -सासऱ्यांनी अतिशय खडतर प्रवासातून यश मिळवल याचा अभिमान वाटतो,असं मुलाखतीत सांगितलंय. ते म्हणाले ''माझे सासरे अतिशय गरिब कुटूबांतले होते आणि माझ्या सासूने काही हजार रुपयांची बचत करत जमवलेल्या पैशातून जगातील एक मोठी आणि तितकचं आदराने नाव घेतली जाणाऱ्या कंपनीची स्थापना केली. ब्रिटनमध्ये देखील हजारोंना रोजगार दिला.'' असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आपण पंतप्रधान झाल्यावर अशा अनेक कथा घडवायच्या असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Web Title: Rishi Sunak Says He Proud Of Journey Of His In Laws
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..