रशिया-युक्रेन वाद अन् बरंच काही; वाचा सविस्तर

आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा आणि यूएन चार्टरला धोका
Russia and Ukraine
Russia and Ukraineटिम ई सकाळ

सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया (Russia) आणि युक्रेन(Ukraine) यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे मात्र अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो (NATO) देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व मिळण्याला रशियाचा तीव्र विरोध आहे. तसं झालं तर आशियातील रशियाचं महत्त्व कमी होणार, अशी भीती रशियाला आहे.

Russia and Ukraine
मुख्यमंत्र्यांच्या नातीने घेतला गळफास, मृत्यूचं गूढ कायम

यावरून गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि नाटो (NATO) संघटना यांच्यात तणाव दिसून येत आहे. युक्रेनच्या मुद्द्यावरून रशिया कठोर भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. युक्रेनला नाटो संघटनेत सभासदत्व मिळू नये, यासाठी रशिया आक्रमक झाली आहे तर अमेरिका (America) आणि नाटोनं तसं लेखी आश्वासन आपल्याला द्यावं, अशी मागणी रशियाने केली होती. आपल्या मागणीसाठी रशियाने दबाव वाढवून युक्रेनच्या सीमेवर सैन्यही तैनात करण्यात आले.

याच दरम्यान युक्रेनवर (Ukraine) मोठा सायबर हल्ला झाला आणि सर्व सरकारी वेबसाईट हॅक (Hacked) करण्यात आल्या. एकीकडे युक्रेन च्या सीमेवर रशियाचे सैन्य सोबत अतिरिक्त 1 लाख फौजा तैनात आणि दुसरीकडे सायबर हल्ला यामुळे युक्रेनवर मोठा संकट कोसळले. युक्रेनवर झालेला सायबर हल्ला कुणी केला, याचे कुठलेही पुरावे समोर आले नसले तरी युक्रेननं पहिला संशय रशियावरच व्यक्त केलाय. यात अमेरिकेनंही युक्रेनच्या बाजूला समर्थन दिले.

रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात केल्याने अमेरिका तसेच, युरोपीय महासंघाने रशियाच्या या बाबीचा निषेध करत युक्रेनच्या संरक्षणासाठी सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही दिली होती. आमच्या सदस्य देशांचे रक्षण करण्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व उपाय करू, असेही ते म्हणाले

Russia and Ukraine
‘Bougette’ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला 'बजेट' शब्द

खरं तर युक्रेन आणि युरोपीय देशांची वाढती जवळीक ही रशियासाठी चिंतेचा विषय बनली आहे. रशियाकडून युक्रेनला असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन नाटोने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा युरोपीय महासंघाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. यावर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 'नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन' (नाटो) या लष्करी संघटनेने युक्रेनला लष्करी बळ पुरविण्याचा निर्णय घेत रशियावर दबाव निर्माण केला होता. 'नाटो'ने पूर्व युरोपमध्ये लढाऊ विमाने व युद्धनौका पाठविण्यास सुरुवात केली. या सर्वाचा परिणाम रशियावर झाला आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्षाने आंतरराष्ट्रीय राजकरणात वादंग पाहायला मिळत आहे.

अखेर फ्रान्स (France) ची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या मॉस्को आणि कीवच्या दूतांमधील चर्चेत दोन्ही देश युद्धविरामासाठी तयार असल्याचे दिसून आले. मात्र, यामुळे अमेरिकासह नाटो आणि रशिया यांच्यातील तणाव किती कमी होईल, हे सांगणे कठीण आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी सध्या युद्धविराम करण्यास तसेच पुढील महिन्यात पुन्हा चर्चा करण्याचे मान्य केले आहे. पॅरिसचर्चेत सहभागी असलेले रशियाचे राजदूत दिमित्री कोझाक म्हणाले की, अनेक मुद्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही पूर्व युक्रेनमध्ये युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. दोन आठवड्यांनंतर, बर्लिन बैठकीत, पॅरिसप्रमाणेच, दोन्ही देशांचे राजदूत पुन्हा चर्चा करतील.

Russia and Ukraine
भारत बायोटेक : इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI ची परवानगी

चर्चेची पुढील फेरी बर्लिन (Berlin) मध्ये होणार आहे. ही चर्चा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेन आता युद्धबंदीवर ठाम राहतील का, या कडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. तरी अद्याप युक्रेन च्या सीमेवर रशियाचे सैन्य सोबत अतिरिक्त 1 लाख फौजा तैनात असल्याने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा आणि यूएन चार्टरला स्पष्ट धोका आहे. युक्रेनच्या या संकटाला तोंड देण्यासाठी पुढील सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आल्याचे युनायटेड स्टेट्स (United States)ने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com