रशिया उभारणार स्वतःचे अवकाश स्थानक

यूएनआय
रविवार, 31 मे 2020

स्वतःचे अवकाश स्थानक बनविण्यासाठी रशियाने तयारी सुरु केली आहे. ‘रॉसकॉसमॉस’ या नावाने ओळखल्याजाणाऱ्या आपल्या अवकाशशास्त्र संस्थेच्यामार्फत ही मोहिम साकारण्यात येईल. ‘रॉसकॉसमॉस’चे प्रमुख दिमीत्री रोगोझीन यांनी ही माहिती दिली. सध्याचे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन-आयएसएस) येत्या दहा वर्षांत सेवा देण्याच्या स्थितीत उरणार नाही. नोव्हेंबर २००० पासून त्यावर विविध अंतराळवीरांचा सतत वावर राहिला आहे.

स्वतःचे अवकाश स्थानक बनविण्यासाठी रशियाने तयारी सुरु केली आहे. ‘रॉसकॉसमॉस’ या नावाने ओळखल्याजाणाऱ्या आपल्या अवकाशशास्त्र संस्थेच्यामार्फत ही मोहिम साकारण्यात येईल. ‘रॉसकॉसमॉस’चे प्रमुख दिमीत्री रोगोझीन यांनी ही माहिती दिली. सध्याचे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन-आयएसएस) येत्या दहा वर्षांत सेवा देण्याच्या स्थितीत उरणार नाही. नोव्हेंबर २००० पासून त्यावर विविध अंतराळवीरांचा सतत वावर राहिला आहे. परिणामी त्याच्या रचनात्मक बांधणीवर ताण पडला आहे. अशा परिस्थितीत हे अवकाश स्थानक २०३० पर्यंत कार्यमुक्त करणे क्रमप्राप्त ठरेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दृष्टिक्षेपात

 • नव्या परिभ्रमण अवकाश केंद्रासाठी पाया म्हणून वापर
 • सध्याच्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राची ‘नासा’सह इतर चार संस्थांच्या साथीत ‘रॉसकॉसमॉस’कडून निर्मिती
 • रशिया नव्या अवकाश स्थानकाच्या बांधणीसाठी पंख असलेले आणि फेरवापर करता येण्याजोगे अवकाशयान तयार करणार
 • सध्याच्या अवकाश केंद्राच्या बांधणीसाठी वापरलेले अवकाशयानाचे स्वयंपूर्ण भाग कामी आणणार

या देशात 10 हजार लोकांमागे 8 डॉक्टर; तरीही कोरोनाचा एकही बळी नाही!

उद्देश काय

 • नवे अवकाश स्थानक अवकाशयान एकत्र येण्याचे ठिकाण असणार
 • अवकाशयानात सौरयंत्रणेत जाण्यापूर्वी पुन्हा इंधन भरण्याची सुविधा
 • अंतराळातील अत्यंत दूरच्या जागांचा शोध लावण्यासाठीचा तळ
 • इतर देशांना वापरू देण्याची तयारी
 • नव्या अवकाश स्थानकावर इतर देशांच्या साथीत कार्य करण्यास रशियाचे धोरण खुले

विमान अर्ध्या वाटेवर गेल्यावर समजले वैमानिक... कोरोना पॉझिटिव्ह

रशियाच्या आगामी मोहिमा

 • २०२८ पर्यंत चंद्रावर अंतराळवीर व इतर कार्यकारी सदस्यांची मोहिम
 • अंगारा ही अवजड लिफ्ट रॉकेट वापरून मंगळावर अंतराळवीर पाठविण्याचा प्रयत्न
 • सध्या अंगाराची बांधणीची प्रक्रिया सुरु
 • अंगाराच्या सज्जतेचा नेमका कालावधी अद्याप नक्की नाही

अमेरिकेचा संदर्भ

 • नासाकडून २०११ मध्ये अवकाश यानउपक्रमाची सांगता
 • त्यानंतर अवकाशयानावर अंतराळवीर नेण्याची क्षमता असलेला रशिया एकमेव देश
 • अंतराळवीर अवकाशात नेण्यासाठी ‘नासा’कडून रशियाला विशिष्ट रक्कम दिली जाते
 • स्पेसएक्‍स मोहिम यशस्वी झाल्यास नासा रशियावर अवलंबून असणार नाही

या राज्याने घातली तब्बल पाच राज्यातील लोकांना बंदी

‘रॉसकॉसमॉस’चा मानस

 • अमेरिकेची मोहिम यशस्वी होण्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या अवकाश प्रकल्पाची सौर यंत्रणेतील व्याप्ती आणखी वाढविणे
 • निर्मितीसाठी एक दशक लागणार असल्यामुळे शक्‍य तितक्‍या लवकर काम सुरु करणार
 • अवकाश परिभ्रमण केंद्रांच्या निर्मितीत पुढाकार घेणारा देश अशी ओळख असल्यामुळे आणखी एक नवी निर्मिती

चंद्र, मंगळ आणि अशनींवरील मोहिमांसाठी अंतराळयान बनविण्यासाठी आम्ही नव्या अवकाश स्थानकाचा वापर करू. याचे कारण यासाठीची संपूर्ण निर्मिती यंत्रणा पृथ्वीवरूनअवकाशात नेणे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक असते.
- दिमीत्री रोगोझीन, ‘रॉसकॉसमॉस’चे प्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia to build its own space station