Russia Ukraine War: युक्रेनचं 'भूत' बनलं रशियाचा काळ; अनेक लढाऊ विमानं पाडली

Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्धादरम्यान 'घोस्ट ऑफ कीव्ह'ची (Ghost of Kyiv) जोरदार चर्चा सुरू आहे.
Ghost of Kyiv
Ghost of KyivSakal

Russia Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. रशियाचे सैन्य युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खार्किवमध्ये (kharkiv) दाखल झाले आहे. रशियन सैन्याने राजधानी कीव्हला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. या युद्धादरम्यान 'घोस्ट ऑफ कीव्ह'ची (Ghost of Kyiv) जोरदार चर्चा सुरू आहे.

जगभरात युक्रेनच्या ज्या भूताची चर्चा रंगत आहे, ते खरोखरीचं भूत नसून युक्रेनचा शूर मिग-२९ (MiG-29 Fulcrum) फायटर विमानाचा पायलट (Pilot) आहे. हा पायलट युक्रेनियन नागरिकांसाठी हिरो ठरलाय. लढाई सुरू झाल्यापासून त्याने रशियन तुकडीमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. या वैमानिकाने आतापर्यंत सहा रशियन लढाऊ विमाने पाडली आहेत. या पायलटमुळे रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे? (Russia Ukraine War: Ukrainian 'ghost of Kyiv' has shot down several Russian fighter jets.)

Ghost of Kyiv
Ukraine-Russia: युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना रॉडनं मारहाण

रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनियन पायलट राजधानी कीव्ह रक्षणासाठी झटतो आहे. तो नियमितपणे कीवच्या आकाशातून उड्डाण करत आहे. त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर रशियाचे मोठे नुकसान केलं आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये या भूताबद्दल दावे केले जात आहेत.

राजधानी कीव्हच्या आकाशात भूत उडताना दिसले?-

युक्रेनच्या एका पत्रकाराने लिहिले आहे की, मी दोन युक्रेनची विमाने कीव्हच्या दिशेने जाताना आणि तिथून येताना पाहिली आहेत. ते म्हणतात की त्यापैकी एक विमान भूत असू शकते. आता सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे की भूत होतं का?

Ghost of Kyiv
Ukraine Russia War : हंगेरीमधून भारताकडे तिसरे विमान रवाना

कीव्हच्या भुताने 6 रशियन विमाने केली नष्ट -

युक्रेनच्या एका वैमानिकाने सहा रशियन विमाने उद्ध्वस्त केल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या पायलटला 'घोस्ट ऑफ कीव्ह' या नावाने संबोधले जात आहे. या पायलटच्या मिग-29 विमानाचे अनेक व्हिडिओ पाहण्यात आले आहेत. युक्रेनच्या या धाडसी पायलटचे कौतुक केले जात आहे.

आता या युद्धाच्या काळात रशियाने बेलारूसमध्ये युक्रेनशी चर्चा करण्याचे मान्य केले आहे, मात्र युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ही ऑफर फेटाळून लावली आहे. त्यांनी बेलारूसमध्ये चर्चा करणार नसल्याचे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com