युक्रेनच्या २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियन सैनिकांनी नेले, झेलेंस्कींचा दावा

युक्रेनच्या २ लाख मुलांना जबरदस्तीने रशियन सैनिकांनी नेले
Volodymyr Zelensky
Volodymyr Zelensky सकाळ डिजिटल टीम

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की म्हणाले, की दोन लाखांपेक्षा अधिक युक्रेनच्या मुलांना रशियन सैनिकांनी जबरदस्तीने रशियात नेले आहेत. झेलेंस्की यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हणाले, की या अपराधी नीतीचा उद्देश मानवी तस्करी करुन लोकांच्या युक्रेनविषयीच्या आठवणे पुसणे आहे. त्यांना मागे फिरण्यालायक न ठेवणे असा आहे. युक्रेन (Ukraine) दोषींना शिक्षा करणार आहे. (Russian Military Abducted Two Lakh Children, Says Ukraine President Zelensky)

Volodymyr Zelensky
मार्ग काढा, औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरेंनी अधिकाऱ्यांना बजावले

मात्र अगोदर रशियाला (Russia) युद्ध मैदानात युक्रेनला जिंकू देणार नाही. आमचे लोक आत्मसमर्पण करणार नाही. आमचे मुले आक्रमण करणाऱ्यांची संपत्ती बनणार नाही.

आतापर्यंत २४३ मुलांची हत्या

झेलेंस्की म्हणाले, रशियाच्या ताब्यातील भागांमध्ये युद्धात आतापर्यंत २४३ मुले मारले गेले आहेत. ४४६ जखमी आणि १३९ मुले बेपत्ता झाले आहेत. ही संख्या जास्तही असू शकते.

Volodymyr Zelensky
भारत पाकिस्तान दरम्यानची सिंधूनदी पाणीप्रश्नावरील चर्चा अंतिम टप्प्यात

कारण रशियन सैनिकांच्या नियंत्रणाखालील भागांमधील स्थितीविषयी सरकारला माहिती नसल्याचे झेलेंस्की म्हणाले. त्यांनी ११ मुलांच्या नावांचा उल्लेख केला आणि त्यांच्या मृत्यूविषयी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com