जेव्हा रशियाचे सैनिक 'ए वतन ए वतन' हे गीत गातात... (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
Saturday, 30 November 2019

ज्यांना आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम आहे, मग तो कोणत्याही देशाचा नागरिक असो, त्या प्रत्येकाने हे गाणे गायला हवेच.

भारत आणि रशिया या दोन देशांमधील मैत्रीसंबंध संपूर्ण जगाला माहित आहेत. कोणत्याही क्षेत्रात जेव्हा जेव्हा भारताला मदतीची गरज निर्माण झाली, तेव्हा प्रत्येकवेळी रशिया भारताच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला आहे. तसेच भारतानेही रशियाशी फक्त व्यावसायिकच नाही, तर सर्वच बाबतीत अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

भारत आणि रशियातील मैत्री आणखी घट्ट होण्याची एक घटना नुकतीच घडली. ही गोष्ट जेवढी रशियासाठी कौतुकाची आहे, त्यापेक्षा ती कैक पटीने भारतीयांसाठी अभिमानाचीदेखील आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाचा अभिमान आणि देशाबद्दल प्रेम असतेच. यासाठी आणखी काही वेगळं करण्याची गरज नाही.

मात्र, मित्रदेशाबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी रशियातील प्रशिक्षणार्थी सैनिक मुलांनी (मिलिटरी कॅडेट्स) 'ऐ वतन ऐ वतन' हे गाणे गायले. रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को या शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ भारतीय सैन्यदलातील एका अधिकाऱ्याने ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत भारतीय सैन्यदलातील ब्रिगेडियर पुष्कर हेदेखील दिसत आहेत. हा व्हिडिओ दहा हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून तो आणखी व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत.    

- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 'रॉकी'च्या रूपात

''ऐ वतन ऐ वतन हमको तेरी क़सम
तेरी राहों मैं जां तक लुटा जायेंगे
फूल क्या चीज़ है तेरे कदमों पे हम
भेंट अपने सरों की चढ़ा जायेंगे
ऐ वतन ऐ वतन''

शहीद (1965) या चित्रपटातील हे गीत गीतकार प्रेम धवन यांनी लिहलं असून मोहम्मद रफी यांनी गायलं आहे. बॉलिवूडचं नातं फक्त भारताशी नसून जगभरातील अनेक देशांशी जुन्या काळापासून राहिलं आहे. राज कपूर अभिनित 'मेरा नाम जोकर' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केलेल्या केसेनिया रियाबिंकिना या अभिनेत्रीमुळे बॉलिवूड आणि भारताचे नाते रशियाशी आणखी घट्ट झाले. 

यावर काही नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, रशिया हा भारताचा चांगला मित्रराष्ट्र राहिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेपेक्षा रशियाला जास्त महत्त्व दिले पाहिजे. तर ज्यांना आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम आहे, मग तो कोणत्याही देशाचा नागरिक असो, त्या प्रत्येकाने हे गाणे गायला हवेच, असे म्हटले आहे.

- पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र 

मोदी सरकार आल्यानंतर प्रत्येक नागरिकाचा देशाभिमानाबद्दलचा दृष्टिकोन आणखी दृढ झाला, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, अर्थविषयक गोष्टींकडेही तेवढेच लक्ष्य द्यायला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

- शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russian military cadets sing Aye watan Aye watan song at an event held in Moscow