संशोधकांनी शोधलं तब्बल 10 कोटी वर्ष जुने फूल

एका आंतरराष्ट्रीय संशोधन टीमने एम्बरमध्ये जतन केलेले 10 कोटी वर्ष जुने फूल शोधून काढले आहे.
100 Million Old Flower
100 Million Old FlowerEsakal

एका आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या (Scientist) टीमने एम्बरमध्ये जतन केलेले तब्बल 10 कोटी वर्ष जुने फूल शोधून काढले आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळणारी काही फुले डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहेत, असा दावा संशोधकांनी केला आहे. नेचर प्लांट्समध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. (Scientist discovered100 million year old flower)

100 Million Old Flower
ॲलेक्सिस कॅरेल: 'शल्यचिकित्से’चा चेहरामोहरा बदलून टाकणारा संशोधक

द ओपन यूनिवर्सिटी आणि किंगदाओ विद्यापीठाच्या (Qingdao University) संशोधकांनी हा शोध लावला आहे. अभ्यासाचे लेखक रॉबर्ट स्पाइसर म्हणतात की, ही फुले आधुनिक फिलिका प्रजातींसारखीच आहेत, जी दक्षिण आफ्रिकेजवळील केपटाऊनच्या जंगलात आढळतात. रॉबर्ट स्पायसर म्हणाले की, पूर्वीच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की फुले उमलतात, नंतर फळांमध्ये बदलतात आणि काही काळानंतर ती गायब होतात. आता नवीन अभ्यासामुळे फुलांची रोपे कशी विकसित होतात हे शोधता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com