बापरे ! तीन महिन्यात 10 लाख ते 100 तासात दहा लाख, जगात कोरोना संसर्गाची दुसरी लाट

विनोद राऊत
Saturday, 18 July 2020

देशात 24 तासात 34 हजार नवे रुग्ण...

मुंबई : जगभरात कोरोना संसर्गाची दुसरी मोठी लाट आल्याचे चित्र आहे. गेल्या 100 तासात जगभरात 10 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंतचा रुग्णवाढीचा हा नवा विक्रम आहे. जगात आता एकुण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 40 लाखावर पोहोचली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 5,95,989 एवढी झाली आहे. 

तीन महिन्यात 10 लाख ते 100 तासात दहा लाख...  

जानेवारी महिन्यात चीनच्या वुहानमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर तीन महिन्यानंतर  जगात 10 लाख कोरोनामुळे बाधित झाले होते. मात्र आता केवळ 13 ते 17 जुलै या चार दिवसात जगात 10 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली असून गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाची तब्बल 75 हजार नवे प्रकरण सापडले आहेत.

हे गंभीर आहे ! कोरोनामुक्त झाल्यानंतरही घ्या काळजी, कारण कोरोनामुळे शरीरावर होतो विपरीत परिणाम?

कोरोना बळींची संख्या 6 लाखावर... 

गेल्या सात महिन्यात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 6 लाखाच्या आसपास पोहोचली आहे. अमेरिकेत सर्वाधिक 1,39,186 मृत्यूंची नोंद झाली असुन ब्राझीलमध्ये 76 हजार रुग्ण दगावले आहेत. भारतातही रुग्णांची संख्या 10 लाखांच्यावर पोहोचली आहे.

भारत ब्राझीलला मागे टाकणार...

देशात कोरोना रुग्ण वाढीचा दर बघता, भारत लवकरचं ब्राझीलला मागे टाकणार असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. सध्या ब्राझीलमध्ये 20 लाखापेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र पुढच्या वर्षभरात जगातिल सर्वाधिक रुग्ण भारतात राहणार असल्याचा इशारा मॅसाच्युसेट इंस्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी या संस्थेच्या  संधोधनात दिला आहे.

मोठी बातमी - 'ते' हेल्मेट घातलं की मिनिटाला होते २०० जणांची तपासणी, कोविड सस्क्रीनिंगसाठीचा 'कमाल' पर्याय...

देशात 24 तासात बाधितांची संख्या 35 हजाराच्या जवळ...

देशात गेल्या 24 तासात 34,884 नवे कोरोना बाधित सापडले आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. एकुण 671 जणांचा मृत्यु झाला आहे. देशात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10,38,716 झाली असून, यामध्ये 3,58,692 सक्रीय रुग्ण आहेत तर 6,53,751 बरे होऊन घरी गेले आहेत.

( संकलन - सुमित बागुल )

second wave of corona in the world in last ten hour 1 million new patients detected


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second wave of corona in the world in last ten hour 1 million new patients detected