श्रीलंकेवर चीनचा आर्थिक दबाव; भारताकडे मागितली मदत

सध्याच्या परिस्थितीत देशात फक्त जानेवारीपर्यंतच इंधन उपलब्ध होईल, असा इशारा श्रीलंकेचे ऊर्जामंत्री उदया गम्मनपिला यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता
India shrilanka
India shrilankasakal media
Updated on

मुंबई : चीनच्या आर्थिक बोजाखाली दबलेल्या श्रीलंकेमध्ये परकीय चलनाचा पेचप्रसंग निर्माण झाला असून कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी श्रीलंकेने भारताकडे पन्नास कोटी डॉलरचे कर्ज मागितले आहे.

India shrilanka
मोदी, बायडेन फोन करत नाहीत; विरोधी नेत्या मरीयमची इम्रानवर टीका

सध्याच्या परिस्थितीत देशात फक्त जानेवारीपर्यंतच इंधन उपलब्ध होईल, असा इशारा श्रीलंकेचे ऊर्जामंत्री उदया गम्मनपिला यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. सरकारी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (सीपीसी) हे बँक ऑफ सिलोन व पीपल्स बँक यांना तीन अब्जांहूनही जास्त डॉलरचे देणे लागतात.

भारत व श्रीलंका यांच्यातील आर्थिक भागीदारी करारानुसार ५० कोटी डॉलरच्या कर्जासाठी येथील भारतीय उच्चायुक्तांशी बोलणी सुरू आहेत, असे सीपीसीचे अध्यक्ष सुमित विजेसिंघे म्हणाल्याचे वृत्त ‘न्यूजफर्स्टआयके’ या स्थानिक संकेतस्थलाने दिले आहे. भारत व श्रीलंका यांचे ऊर्जा सचिव लवकरच यासंदर्भात करार करतील, असे श्रीलंकेचे अर्थ सचिव एस. आर. अट्टीगल्ले यांनी म्हटल्याचा दाखलाही या वृत्तात दिला आहे.

India shrilanka
पाकिस्तान आर्थिक संकटात; IMF ने नाकारले कर्ज

परकीय चलन घटले

श्रीलंकेत इंधन दरवाढ रोखून धरण्यात आली आहे. मात्र कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने श्रीलंकेला इंधनासाठी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी ४१ टक्के जास्त म्हणजे दोन अब्ज डॉलर परकीय चलन खर्च करावे लागले आहे. श्रीलंकेला पर्यटनातून तसेच परदेशात गेलेल्या श्रीलंकेच्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे हा ओघ आटल्याचे अर्थमंत्री बसिल राजापक्षा यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com