श्रीकांत दातार ‘हार्वर्ड’चे नवे डीन

वृत्तसंस्था
Sunday, 11 October 2020

भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अधिष्ठाता (डीन) पदावर नियुक्ती झाली आहे. ११२ वर्षांच्या या प्रतिष्ठित संस्थेच्या डीनपदी निवड झालेले दातार हे दुसरे भारतीय भारतीय आहेत. यापूर्वी ही जबाबदारी नितीन नोहरीया यांच्याकडे होती.

वॉशिंग्टन - भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अधिष्ठाता (डीन) पदावर नियुक्ती झाली आहे. ११२ वर्षांच्या या प्रतिष्ठित संस्थेच्या डीनपदी निवड झालेले दातार हे दुसरे भारतीय भारतीय आहेत. यापूर्वी ही जबाबदारी नितीन नोहरीया यांच्याकडे होती.

एकानेही मास्क न घातलेल्या हजारोंच्या सभेत किम यांची कोरोनासंबंधी मोठी घोषणा

‘आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’चे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली. १ जानेवारी २०२१ पासून दातार या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

रशियाच्या मध्यस्थीला यश; अर्मेनिया-अझरबैजान यांच्यात युद्धविराम

बाको म्हणाले की, श्रीकांत दातार हे नवउपक्रमशील शिक्षक, एक प्रतिष्ठित अभ्यासक आणि अनुभवी प्राध्यापक आहेत. व्यावसायिक शिक्षणाच्या भवितव्याबद्दल ते सातत्याने विचार करतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या जागतिक साथीदरम्यान उद्‍भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली 
आहे. दातार यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेली २५ वर्षे विविध पदांवर काम केले असल्याचेही बाको यांनी सांगितले. 

नोहरिया यांनी केले स्वागत
दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे ११ डीन असतील. गेल्या दहा वर्षे हे पद भूषविणारे नितीन नोहरिया यांची मुदत जून महिन्यात संपणार होती. पण कोरोनाच्या साथीमुळे ते डिसेंबरपर्यंत या पदावर असतील. दातार १ जानेवारी २०२१ रोजी कार्यभार स्वीकारणार आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन म्हणून श्रीकांत यांची निवड अत्यंत योग्य आहे, अशा शब्दात नोहरिया यांनी दातार यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

देदीप्यमान कारकीर्द
दातार यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनोन शाळेतून पूर्ण केले. १९७३ मध्ये मुंबई विद्यापीठातून गणित आणि अर्थशास्त्रात विशेष प्रावीण्यासह पदवी प्राप्त केली. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या ‘आयआयएम’मधून बिझनेस मॅनेजमेंट या विषयातून पदव्युत्तर पदविकेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी केली. १९८४ ते १९८९ पर्यंत ‘कार्नेगी मेलॉन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंडस्ट्रिअल अॅडमिनिस्ट्रेशन’मध्ये दातार सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांना जॉर्ज लेलंड बॅच शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. १९९६ पर्यंत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलमध्ये ते प्राध्यापक होते. दातार हे आयआयएम कोलकताच्या व्यवस्थापन समितीवर आहेत.

डीनपदी निवड करणे हा माझा सन्मान असून ती मी नम्रपणे स्‍वीकारतो. संशोधन, शिक्षण आणि प्रात्यक्षिक ज्ञान हे ‘एचबीएस’चे वैशिष्ट आहे. संस्थेतील सहकारी व मित्रांना बरोबर घेऊन उद्दिष्ट्यपूर्तीसाठी काम करणार आहे.
श्रीकांत दातार, नवनियुक्त डीन

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Srikant Datar is the new Dean of Harvard