एव्हरेस्टची कमी होणारी उंची सर्वसामान्यांची वाढणार डोकेदुखी.....

गिर्यारोहक, पाण्यासाठी आणि सिंचनासाठी हिमनदीवर अवलंबून असलेल्यांना धोका निर्माण झाला आहे
Mount Everest
Mount Everestesakal

माउंट एव्हरेस्टवरील सर्वोच्च हिमनदी साउथ कोल ग्लेशियरच्या वितळण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मानव प्रेरित हवामान बदल तसेच तापमानामुळे (Tempreture) या हीमनदीवर परिणाम झाल्याने एव्हरेस्टवर (Mount Everst) स्केलिंग करणे पूर्वीपेक्षा कठीण होऊ शकते, असा इशारा एका नवीन अभ्यासानुसार(Study) देण्यात आला आहे. तसेच साउथ कोल ग्लेशियरच्या वितळण्यामुळे हिमस्खलनात वाढ होऊ शकते,असेही सांगितले आहे. मेन विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने गुरुवारी याविषयी अभ्यास प्रकाशित केला आहे. सीएनएनने याविषयी वृत्त प्रसिद्ध केले आहे.

Mount Everest
दहा अब्ज डॉलर खर्च करुनही 'मेटा'ला झाला तोटा; 'हे' आहे कारण

अभ्यासात आढळल्या गंभीर गोष्टी

अभ्यासानुसार, वाढत्या जागतिक तापमानामुळे हिमस्खलनात वाढ झाल्याने भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जवळपास एक अब्ज लोकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो, असे या अभ्यासात म्हटले आहे. अहवालानुसार, या ग्लेशियरचे जवळपास 55 मीटर क्षेत्र गेल्या 25 वर्षांत वितळले आहे. जे त्याच्या 2,000 वर्षांच्या निर्मितीपेक्षा 80 पट जास्त आहे. महत्वाचे म्हणजे हिमालयातील पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जर भविष्यात काही अडचणी आल्या तर, उतारावरून बर्फाचे जाड गोळे पडून येथील पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्यामुळे,माउंट एव्हरेस्टच्या भविष्यातील मोहिमा कठीण होतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Mount Everest
'गलवान'वरून अमेरिकेचा चीनला इशारा; मित्रराष्ट्राच्या बाजूने उभा राहणार
शास्त्रज्ञ हिमशिखरावर अभ्यास करत आहेत.
शास्त्रज्ञ हिमशिखरावर अभ्यास करत आहेत. google

आतापर्यंत जगातील सर्वात उंच भागात असलेल्या पर्वतीय हिमनद्या वितळण्यामुळे होणारे परिणाम फार कमी वेळा अभ्यासले गेले आहेत. त्यामुळे या अभ्यासाला महत्व आहे. या अभ्यासातील निष्कर्ष हे 2019 मध्ये आयोजित केलेल्या नॅशनल जिओग्राफिक आणि रोलेक्स पर्पेच्युअल प्लॅनेट एव्हरेस्ट मोहिमेतील डेटा वापरून काढण्यात आले आहेत. अभ्यासासाठी, संशोधन पथकाने 8,420 मीटर आणि 7,945 मीटर उंचीवर दोन हवामान केंद्रे स्थापन केली होती. ही हवामान केंद्रे एव्हरेस्टच्या बर्फाचे नमुने गोळा करण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती.

साउथ कोल ग्लेशियरमधून घेतलेल्या बर्फाचा अभ्यास करून, तसेच हवामान केंद्रे आणि उपग्रह प्रतिमांचा डेटा एकत्र करण्यात आला. संशोधकांना असे आढळले की हवामान बदलाच्या परिणामांमुळे पर्वतांवर अनेक लक्षणीय बदल झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हिमनदीवरील बर्फ दरवर्षी 2 मीटर वेगाने कमी होत आहे. त्याचे कारण सौर विकिरण परावर्तित करण्याची हिमनदीने क्षमता गमावली आहे.

Mount Everest
चीनकडून 192 टक्क्यांनी आयात वाढली, केंद्रीय मंत्र्यांचा खुलासा

शास्त्रज्ञ काय म्हणतात?

पॉल मेवेस्की, मोहिमेचे नेते आणि UMaine च्या हवामान बदल संस्थेचे संचालक मोहिमेविषयी म्हणाले, की एव्हरेस्टवरील हिमनद्या मानवी-स्रोताच्या हवामान बदलामुळे प्रभावित होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. 1990 च्या उत्तरार्धापासून हे प्रमाण खूप लक्षणीय आहे, असेही ते म्हणाले. हे प्रमाण वाढत राहिले, तर हिमनदीतील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळून भविष्यात माउंट एव्हरेस्टवरील चढाई मोहीम अधिक धोकादायक होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com