कोरोनाकडे गांभीर्याने पाहा; ज्यो बायडेन यांचे आवाहन

पीटीआय
Sunday, 4 October 2020

अध्यक्षीय निवडणूक महिन्यावर आलेली असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोना झाल्याने संसर्गाचे सावट वाढत चालले आहे. या पाश्‍वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी कोरोना संसर्गाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत मांडले आहे.

वॉशिंग्टन - अध्यक्षीय निवडणूक महिन्यावर आलेली असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोना झाल्याने संसर्गाचे सावट वाढत चालले आहे. या पाश्‍वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी कोरोना संसर्गाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत मांडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बायडेन यांनी ट्रम्प यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत असताना मास्क घालणे, सतत हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असेही आवाहन केले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क हे सर्वाधिक प्रभावी उपकरण आहे. आपण जबाबदारीने राहणे देखील आवश्‍यक असल्याचेही बायडेन म्हणाले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना काल कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यावर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ट्रम्प यांना कोरोना झाल्याने प्रचार मोहिमेला धक्का लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मास्क वापरण्यावरून बायडेन यांची खिल्ली देखील उडवली होती. बायडेन म्हणाले की, हा राजकारणाचा मुद्दा नाही. परंतु कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हा संसर्ग आपोआप कमी होणार नाही. सर्वांनी जबाबदारीने राहणे गरजेचे आहे. मास्क वापरण्यावर भर देताना बायडेन यांनी हे उपकरण आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे, असे नमूद केले.

जगातिल सर्वात उंच बिल्डिंग बांधणारी कंपनी पडणार बंद; 40,000 जणांना जावं लागणार घरी

सीडीसी (सेंट्रल फॉर डिसिज कंट्रोल ॲड प्रिव्हेशन) च्या प्रमुखाच्या मते, जर आपण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला तर पुढील १०० दिवसात एक लाख लोकांचे प्राण वाचवू शकतो. मास्कचा वापर केल्याने केवळ आपलेच नाही तर आपल्या भोवती असलेल्या कुटुंबातील लोकांचे देखील संरक्षण होऊ शकते. कोरोना संसर्ग गंभीर असून त्यासाठी नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. ही गोष्ट केवळ व्हाईट हाऊस किंवा माझ्यापुरती मर्यादित नसून देशातील प्रत्येक नागरिकांनी याबाबत सजग राहणे गरजेचे आहे, असे बायडेन म्हणाले.

आर्मेनियाशी युद्धामुळे अझरबैजानचं मोठं नुकसान; 3 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू 

ट्रम्प यांच्या तब्येतीत सुधारणा
कोरोनाची लागण झाल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका सैनिकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन दिले जात असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे व्हाइट हाउसच्या डॉक्टरांनी सांगितले. ट्रम्प प्रशासनाने या वर्षी सुरुवातीला रेमडेसिव्हिरचा उपयोग आपत्कालिन स्थितीत करण्यासाठी परवानगी दिली होती. ट्रम्प यांना वॉशिंग्टन डिसीतील मेरिलँड उपनगरातील बेथेस्डाच्या वॉल्टर रीड सैनिकी वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आहे. व्हाइट हाऊसचे आरोग्य अधिकारी सीन कॉनले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची शिफारस आरोग्य तज्ञांनी केली आणि त्यानुसार उपचार सुरू केले.  

डोनाल्ड ट्रम्प यांचा आजार वाढला तर कोणाकडे जाणार सत्ता?

दोन सिनेटरनाही कोरोनाची बाधा
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांना लागण झाल्यानंतर व्हाइट हाउसमधील त्यांच्या सहकाऱ्यांना बाधा झाल्याचे उघड झाले आहे. दोन सिनेटर, त्यांचे माजी सल्लागार, त्यांचे प्रचार प्रमुख आणि व्हाइट हाउसमधील तीन पत्रकारांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रिपब्लिकन सिनेटर थॉम टिल्स, माइक ली यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच व्हाइट हाउसच्या माजी सल्लागार केलिन कॉनवे यांनी सोशल मीडियावर कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले. टेलिस, ली आणि कॉनवे हे तिघेही शनिवारी व्हाइट हाउसच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय ट्रम्प यांचे प्रचार प्रमुख बिल स्टीफन यांनाही लागण झाली आहे. व्हाइट हाउसमधील तीन पत्रकारांना बाधा झाल्याचे व्हाइट हाउस करन्स्पाँडन्स असोसिएशनने सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Takecare Corona seriously Joe Bidens appeal