बिल गेट्‌स म्हणतात, 'भारतासाठी तंत्रज्ञानच महत्त्वाचं ठरणार'

वृत्तसंस्था
Sunday, 17 November 2019

बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून भारतातील दुर्लक्षित घटकांसाठी आरोग्यसेवा, आर्थिकसेवा, कृषिसेवा देण्यासाठी काम करीत आहे.

नवी दिल्ली : ''पुढील दहा वर्षांमध्ये वेगाने आर्थिक विकास करण्याची भारताची क्षमता आहे. या विकासामुळे लोक गरिबीतून वर येतील आणि सरकारलाही आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येईल,'' असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्‌स यांनी केले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

बिल गेट्‌स हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच, 'बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशन' या त्यांच्या संस्थेमार्फत ते अनेक सामाजिक उपक्रम राबवितात आणि अनेक कामांना भरघोस आर्थिक मदतही करतात. ते सध्या त्यांच्या संस्थेनिमित्त भारतात आले असताना त्यांनी 'पीटीआय'ला विशेष मुलाखत दिली.

- भारत सरकार नळाद्वारे पाण्यासाठी इस्राईलची घेणार मदत

ते म्हणाले, ''भारताची आर्थिक सेवा क्षेत्रातील आणि औषधनिर्माण क्षेत्रातील कामगिरी चांगली आहे. आधार कार्ड पद्धतही चांगली आहे. नजीकच्या काळाबद्दल मला फारसे माहीत नाही. मात्र, आगामी दहा वर्षांमध्ये वेगाने विकास करण्याची, लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याची आणि शिक्षण, आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची क्षमता भारतामध्ये आहे.'' 

- बिल गेट्‌स पुन्हा जगातील सर्वांत धनवान; कोणाला टाकले मागे?

बिल गेट्‌स यांनी आधार यंत्रणेचेही कौतुक केले. ''आम्ही काम करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रात भारताचे महत्त्व आहे. येथे आम्हाला नवीन संशोधक आणि आर्थिक सेवा मिळतात. आधार यंत्रणाही वेगाने स्वीकृत होत असून, त्यातून इतरांनी धडा घेण्यासारखा आहे. भारताने केलेला हा प्रयोग इतर देशांमध्येही राबविण्याबाबत आम्ही विचार करतो,'' असे गेट्‌स म्हणाले.

- श्रीलंकेची सूत्रे आता गोताबाया राजपक्षेंकडे

लस उत्पादनातील भारताच्या कामगिरीवरही त्यांनी आनंद व्यक्त केला. भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण असताना बिल गेट्‌स यांनी मात्र भारताकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे. 

बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून भारतातील दुर्लक्षित घटकांसाठी आरोग्यसेवा, आर्थिकसेवा, कृषिसेवा देण्यासाठी काम करीत आहे. भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारी करीत त्यांनी अनेक लसी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technology can help India into inclusive growth says Bill Gates