'माझा मुलगा हिंसक नव्हता...' अमेरिकेतल्या हल्लेखोराच्या आईची प्रतिक्रिया

टेक्सासमधल्या शाळेत अंधाधुंद गोळीबार करणारा हल्लेखोर मानसिक रुग्ण
Texas shooting
Texas shooting sakal

२४ मे हा दिवस अमेरिकेसाठी रक्तरंजित ठरला. टेक्सासमधल्या रॉब इलिमेंटरी स्कूलमध्ये एका १८ वर्षाच्या माथेफिरूने अंधाधुंद गोळीबार केला, ज्यात १९ मुलांसह २ शिक्षकांचा मृत्यू झाला. साल्वाडोर रामोस असं या १८ वर्षीय हल्लेखोरच नाव आहे, या हल्ल्यासाठी त्यानं एआर -१५ या बंदुकीचा वापर केला होता.

Texas shooting
Texas Shooting: आधी आजीवर झाडली गोळी, नंतर शाळेत गोळीबार; हल्ल्यानंतरची हृदयद्रावक दृश्ये

दरम्यान, साल्वाडोर रामोसची आई अँड्रियाना रेयेसचं म्हणणं आहे कि, माझा मुलगा हिंसा करणारा व्यक्ती नव्हता. एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना अँड्रियाना यांनी सांगितले कि, 'तो हिंसक नव्हता. त्याला फार कमी मित्र- मैत्रीण होते. त्याला फार एकटेपणा वाटायचा. बऱ्याचदा तो घरच्यांशी सुद्धा बोलायचा नाही. तो स्वतःमध्येच मग्न असायचा. पण त्यानं जे केलं त्यावर मला अजूनही विश्वास बसत नाहीये.'

Texas shooting
माजी विद्यार्थ्याचा शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार; २१ जणांचा मृत्यू

अँड्रियानाच्या म्हणण्यानुसार, तिचं आणि साल्वाडोरचं मंगळवारी म्हणजे हल्ल्याच्या एक दिवस आधीच बोलणं झालं होत. त्याचा १८ व्या वाढदिवसानिम्मित अँड्रियानाने गिफ्ट सुद्धा दिल होत. घरातल्या कुठल्याच व्यक्तीला माहित नव्हतं कि त्याच्याकडे बंदूक आहे. अँड्रियाना म्हणाल्या कि, मी मृत पावलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करेल.

Texas shooting
'हाऊ टू किल युवर हजबंड' हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखिकेनेच केला पतीचा खून

माहितीनुसार, साल्वाडोर एका शॉपमध्ये काम करायचा. तिथे त्याच्या सोबत काम करणारी ग्रेस क्रूझचे म्हणणे आहे कि, तो फारच विचित्र होता. त्यामुळे मी त्याच्यापासून लांबच राहायचे. कामाच्या ठिकाणी बऱ्याचदा त्याचे वाद व्हायचे. कामाचे पैसे तो शस्त्रे घेण्यासाठी खर्च करायचा. त्याच्याकडे पुरेसे पैसे जमा झाल्यांनतर त्याने नोकरी सोडली आणि त्यांनतर काही दिवसातच त्याने हा हल्ला घडवून आणला.

Texas shooting
अफगाणिस्तान : दोन वेगवेगळ्या स्फोटात 14 लोक ठार, ISIS नं केलं तीन बसना लक्ष्य

असं म्हंटल जातंय कि, साल्वाडोरने जवळपास ४००० यूएस डॉलर शस्त्र खरेदीसाठी खर्च केले होते. त्याला मानसिक समस्या होत्या. याआधी सुद्धा त्याने २-३ ठिकाणी काम केले होते जिथे त्याचे कोणाशी ना कोणाशी वाद झालेले. ज्यामुळे त्याला काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, हल्ल्याच्या अर्धा तास आधी त्याने तीन पोस्ट सुद्धा टाकल्या होत्या. तसेच इंस्टाग्रामवर आपल्या मैत्रीला 'आज काहीतरी करणार' असल्याचं मेसेज सुद्धा टाकला होता. शाळेवर गोळीबार करण्याचा आधी त्याने आपल्या आजीवर गोळी झाडली होती.

Texas shooting
व्लादिमीर पुतीन यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याचा प्रयत्न फसला

रागाच्या भरात त्यानं हे कृत्य केल्याचं समजतंय. माहितीनुसार यामागचं कारण म्हणजे शाळेत असताना तो बोलताना अडखळायचा ज्यामुळे शाळेतली मुलं त्याला चिडवायची, त्याची मस्करी उडवायची. आई ड्रग्ज घेत असल्यामुळे घरात सतत वाद व्हायचे, आईशी होत असलेल्या वादामुळे तो आपल्या आजी- आजोबांसोबत राहायचा.यामुळे त्याची शाळा सुद्धा सुटली होती.

Texas shooting
भारताचं क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात पडलं, अमेरिकेनं दिला थेट इशारा

मात्र, साल्वाडोरची आई अँड्रियानाच्या म्हणण्यानुसार आमच्या कटू संबंध होते या सगळ्या अफवा आहेत. जो जरी जास्त बोलायचा नाही तरी आमचे संबंध चांगले होते. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्रतिउत्तरादाखल कारवाईत हल्लेखोर मारला गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com