

Security forces and emergency responders gather outside a school in Thailand after a deadly shooting that killed 34 people, including 22 students
esakal
Thailand School Attack: थायलंडमधून भयानक बातमी समोर येत आहे. सोंगखला येथील हाटयाई भागातील एका शाळेत एका बंदूकधार्याने घुसून अंदाधुंद गोळीबार केला आणि तेथील विद्यार्थी व शिक्षकांना ओलीस ठेवलं होते.
सशस्त्र हल्लेखोराने आधी विद्यार्थी आणि शिक्षकांना ओलीस ठेवले आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात २२ विद्यार्थ्यांसह ३४ जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली होती, परंतु त्यानंतर स्थानिक मीडियामधून समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार सशस्त्र हल्लेखोराने शाळेत घुसून गोळीबार केला. शाळा सुटण्याची वेळ असतानाच बंदूकधारी हल्लेखोराने शाळेत प्रवेश केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तसेच , पोलिस अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितले की हल्लेखोराने काही शिक्षक आणि मुलांना ओलीस ठेवले असून, अनेक विद्यार्थी अजूनही इमारतीत अडकले आहेत. सशस्त्र पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेबाबत अजूनही वेगवेगळे अपडेट येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.