Crocodile : एकाच गावातील 80 लोकांचा जिव घेणारी ओसामा बिन लादेन...

एकाच गावातील 80 लोकांचा जिव घेणाऱ्या 'ओसामा बिन लादेन' या 16 फूट भयानक मगरीची कहाणी...
crocodile
crocodileसकाळ डिजिटल टीम

पृथ्वीतलावर अनेक धोकादायक प्राणी आढळतात. धोकादायक असलेल्या या प्राण्यांच्या यादीत मगरीलाही शिकारी प्राणी मानले जाते. ज्या प्राण्यांसोबत माणसांना देखील आपली शिकार बनवतात. आज आम्‍ही तुम्‍हाला इतिहासातील अशा एका भयंकर मगरीची ओळख करून देणार आहोत, जिच्‍या दहशतीमुळे तिला 'भयंकर दहशतवादी' असे नाव दिले गेले होते. आफ्रिकेतील(Africa) युगांडा (Uganda) येथील एका गावात या मगरीने 15 वर्षे आपली दहशत निर्माण केली होती. यानंतरच भयंकर दहशतवादी 'ओसामा बिन लादेन'च्या नावावरून मगरीचे नाव 'ओसामा' असे ठेवण्यात आले. या मगरीची लांबी किमान 16 फूट होती. ओसामा मगरीने (Osama Crocodile) 1990 ते 2005 या काळात लुगंगा गावातील लोकसंख्येच्या एक दशांश लोकांची शिकार केली होती. या मगरीने गावातील 80 लोकांचा जिव घेतला होता. तिच्या दहशतीने त्याकाळात संपूर्ण गावकरी घाबरलेले होते.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ओसामा ही मगर आफ्रिकेतील सर्वांत मोठ्या लेक व्हिक्टोरियामध्ये राहत होती. ती राहत असलेल्या तलावाजवळ जर कुणी माणूस गेला तर मग ओसामा त्या माणसाला आपली शिकार करत असे. संधी पाहून ती तलावाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीवर झेपावत असे आणि त्याला पाण्यात ओढून नेऊन खात असे. याशिवाय अनेकवेळा तिने बोटीवरील लोकांवर हल्ला चढवून त्यांची हत्या केली आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, मृतांपैकी एकाचा भाऊ पॉल केवलयांगा याने ओसामाने आपल्या बोटीवर कशा प्रकारे हल्ला चढवला होता हे सांगितले आहे. या हल्ल्यात त्याचा भाऊ पीटर मारला गेला. पॉल मागच्या बाजूला बसून बोट चालवत होता, तर त्याचा भाऊ पीटर समोर बसून मासेमारी करत होता. त्यानंतर अचानक ओसामाने बोट ढकलून उलटी केली. या हल्ल्यात बोट उलटी झाल्यामुळे पीटर पाण्यात पडला, तर पॉल हा पक्का बोटीत बसलेलेला राहिला. त्यामुळे तो बोट घेऊन तिथून वायूवेगाने परतला. म्हणून तो जीव वाचवण्यात यशस्वी झाला. पीटरने ओसामा मगरीसोबत 5 मिनिटे झुंज दिली पण भयंकर मगरीपासून सुटका करुन घेणे सोपे नव्हते. अखेर त्याला आपला जिव गमवावा लागला.

crocodile
राजापूर ःराजवाडी कांगापूर येथे प्रथमच आढळली मगर

पुढे मग 2005 मध्ये गावकरी आणि वन्यजीव अधिकाऱ्यांच्या मदतीने ओसामा मगरीला पकडण्याचा कट आखण्यात आला. त्यासाठी एक आठवडा मोहीम राबविण्यात आली. आणि ही मोहमी यशस्वी झाली. या मोहिमेमेत एक सापळा तयार केला गेला. मगरीला अडकवण्यासाठी मांसाचा तुकडा सापळ्यात ठेवण्यात आला होता. नंतर मग ओसामा त्या सापळ्यात अडकली. सापळ्यात अडकल्यानंतर वन्यजीव अधिकारी तिला आपल्या सोबत घेऊन गेले. अशारीतीने 2005 मध्ये अनेक निष्पाप जीव गमावल्यानंतर गावकऱ्यांची मगरीच्या दहशतीतून सुटका करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com