भारतीय वंशाच्या गीतांजलीनं रचला इतिहास; 'किड ऑफ द ईअर'ची ठरली मानकरी

gitanjali rao
gitanjali rao

न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या किशोरी गीतांजली राव हिने टाइम मॅगझीनचा आतापर्यंतचा पहिला 'किड ऑफ द ईअर' हा पुरस्कार जिंकला आहे. ती एक हुशार युवा संशोधक आहे. गीतांजली यांनी दुषित पेयजलापासून ते गांजाच्या नशेपासून मुक्त होण्याबाबतीत संशोधन करुन महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. टाइमने म्हटलंय की, हे जग त्यांचं आहे जे या जगाला आकारास आणतात. टाइमच्या पहिल्या 'किड ऑफ द ईअर' या पुरस्कारासाठी 5,000 हून अधिक दावेदारांमधून गीतांजलीची निवड करण्यात आली आहे. टाइम स्पेशलच्या एंजलीना जोली यांनी त्यांची मुलाखत घेतली. 

गीतांजली यांनी कॉलरॅडोमधील आपल्या घरातून एंजलीना जोली यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे मुलाखत घेतली. यादरम्यान तिने म्हटलं की, अवलोकन करा, विचार करा, संशोधन करा, निर्मिती करा आणि मग ते लोकांना सांगा. टाइमच्या म्हणण्यानुसार गीतांजलीने म्हटलं की, प्रत्येक समस्येवरील उत्तर शोधण्याचा प्रयत्न करु नका, तर त्या एकाच समस्येवर लक्ष्य द्या जी तुम्हाला आकर्षित करते. जर हे मी करु शकत असेन तर ते कुणीही करु शकेल. गीतांजलीने पुढे म्हटलं की, आमची पीढी अनेक समस्यांचा सामना करत आहे ज्या आधी कधीच आल्या नव्हत्या.

गीतांजलीने म्हटलं की, सोबतच, आम्ही जुन्या समस्यांशीही लढत आहोत ज्या अद्याप तशाच आहेत. जसे की आता आपण एका नव्या जागतिक महामारीशी लढत आहोत तसेच अजूनही आपण मानवाधिकारांच्या मुद्यांचा सामना करत आहोत. अशा समस्या आहेत ज्या आपण निर्माण केलेल्या नाहीयेत मात्र आता आपल्याला तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्यावर उपाय शोधायला हवा.  तिने पुढे म्हटलं की ती दुसरी-तिसरीत असल्यापासूनच या गोष्टीवर विचार करतेय की ती तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक बदल आणण्यासाठी कशाप्रकारे करु शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com