Bird Flu In Human: बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण ऑस्ट्रेलियात तर दुसरा अमेरिकेत, भारतात असताना परदेशी मुलाला संसर्ग

Bird Flu: काही आठवड्यांपूर्वी भारतात आला असताना एका मुलाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाला होता. नुकतीच मीडिया रिपोर्टमध्ये या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.
Bird Flu In Human
Bird Flu In HumanEsakal

ऑस्ट्रेलियाने मानवांमध्ये झालेल्या 'बर्ड फ्लू'च्या संसर्गाच्या पहिल्या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. काही आठवड्यांपूर्वी भारतात आला असताना एका मुलाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाला होता. नुकतीच मीडिया रिपोर्टमध्ये या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.

नाईन न्यूजने, आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, व्हिक्टोरियामधील एका मुलामध्ये बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. ऑस्ट्रेलियातील बर्ड फ्लूची ही पहिलीच घटना आहे. भारतात राहत असताना हा मुलगा H5N1 फ्लूचा बळी ठरला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मुलामध्ये नुकतीच संसर्गाची पुष्टी झाली आहे तो मार्च 2024 मध्ये परदेशातून ऑस्ट्रेलियाला परतला होता. मुलाला गंभीर संसर्ग झाला होता पण आता तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.

व्हिक्टोरियातील एका फार्ममध्ये बर्ड फ्लूच्या रुग्णाची ओळख पटल्यानंतर काही तासांनंतर या प्रकरणाची घोषणा करण्यात आली, असे वृत्त नाइनन्यूज डॉट कॉम एयूने दिले आहे.

Bird Flu In Human
Bird Flu In Human: बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण ऑस्ट्रेलियात तर दुसरा अमेरिकेत, भारतात असताना परदेशी मुलाला संसर्ग

दरम्यान अमेरिकेत बर्ड फ्लूच्या दुसऱ्या मानवी प्रकरणाची पुष्टी झाली आहे, रॉयटर्सने यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा हवाला देत अहवाल दिला आहे.

मार्चच्या उत्तरार्धात दुभत्या जनावरांमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळला होता. बर्ड फ्लूच्या दुसऱ्या मानवी प्रकरणाची पुष्टी झाली आहे, रॉयटर्सने यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा हवाला देत ही माहिती दिली आहे. मार्चच्या उत्तरार्धात दुभत्या जनावरांमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळला होता.

Bird Flu In Human
Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

बर्ड फ्लू आजाराबद्दल...

बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, जो विषाणूजन्य संसर्ग आहे. ते पक्ष्यापासून पक्ष्यांमध्ये पसरतो. मात्र आता तो माणवामध्येही संक्रमित होत असल्याचे समोर आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, बर्ड फ्लू सामान्यत: रानटी पक्ष्यांमधून पाळीव पक्ष्यांमध्ये पसरतो. हा विषाणू पक्ष्यांच्या आतड्यांवर किंवा श्वसन प्रणालीवर हल्ला करतो. अनेक प्रकरणांमध्ये, यामुळे पक्ष्यांचा मृत्यू देखील होतो.

हा विषाणू देखील सामान्य व्हायरसप्रमाणे पसरतो. हा विषाणू संक्रमित पक्ष्याच्या लाळ, नाकातील द्रव किंवा विष्ठेद्वारे पसरू शकतो. अशा परिस्थितीत दुसरा पक्षी संपर्कात आल्यास त्यालाही संसर्ग होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com