प्रियकरासोबत रोमान्स करताना बाळ रडायचे म्हणून...

वृत्तसंस्था
Thursday, 16 January 2020

प्रियकरासोबत रोमान्स करताना बाळ रडत होते म्हणून त्याला बाथरूमध्ये कोंडले. अन्न-पाण्या अभावी दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी प्रियकर व बाळाच्या आईला अटक केली आहे.

तैवान: प्रियकरासोबत रोमान्स करताना बाळ रडत होते म्हणून त्याला बाथरूमध्ये कोंडले. अन्न-पाण्या अभावी दोन वर्षांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी प्रियकर व बाळाच्या आईला अटक केली आहे.

एकाने लैंगिक क्षमतेसाठी घेतलं रेड्याचं औषध मग...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 22 वर्षीय युवतीला दोन वर्षांचे बाळ होते. युवतीची एका युवकासोबत ओळख झाली होती. प्रियकरासोबत ती फ्लॅटमध्ये राहात होती. प्रियकरासोबत दारू पिवून रोमान्स करताना बाळाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे तो रडत असे. यामुळे ते बाळाला बाथरूममध्ये कोंडत असत. एकदा दारू पिवून रोमान्स करताना बाळ रडू लागल्यामुळे प्रियकराने बाळाला बाथरूममध्ये कोंडले होते. यानंतर बाळाची आई बाहेर गेली होती. बाळ रडून थकले आणि अन्न-पाण्याअभावी त्याचा मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

विवाहानंतर कळलं 'ती' निघाली 'तो' अन्....

बाळाचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला होता. अहवालामध्ये अन्न-पाणी न मिळाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

प्रेयसीला रात्री शेतात भेटायला बोलावले अन्‌...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two year old boy starved till death as mothers bf locked him in toilet at taiwan