Russia Ukraine War : रशियन सैन्यात पसरला 'माउस फिव्हर', डोळ्यातून वाहतंय रक्त; युक्रेनचा दावा

युक्रेनच्या गुप्तचर विभागाने रशियन युनिट्समध्ये कथित 'माउस फिव्हर' पसरल्याची माहिती दिली आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarSakal

रशिया-युक्रेन युद्ध दोन वर्षांपासून सुरू आहे. या युद्धाकडे दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या ही युद्धात आजवर शेकडो सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र अजूनही अनेक आघाड्यांवर युद्ध सुरूच आहे.

यादरम्यान युक्रेनने मोठा दावा केला असून रशियन सैनिकांना एका भयंकर आजाराने ग्रासल्याचे म्हटले आहे. या आजारामुळे लोकांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागते, खूप जोरात डोके दुखी आणि उल्टीचा त्रास होतो.

युक्रेनच्या गुप्तचर विभागाने रशियन युनिट्समध्ये कथित 'माउस फिव्हर' पसरल्याची माहिती दिली आहे. हा रोग एक प्रकारचे स्ट्रेप्टोकोकल संक्रमण असून उंदरांच्या संपर्कात आल्याने किंवा त्यांची विष्ठा श्वासनातून माणसांच्या शरिरात गेल्याने पसरतो.

युक्रेनने दावा केला आहे की, या आजाराची लक्षणे ही गंभीर डोकेदुखी, शरीराचे तापमान ४० डिग्रीपर्यंत वाढणे, शरीरावर व्रण उठणे, त्वचा लाल पडणे, लो ब्लड प्रेशर, डोळ्यात रक्तस्त्राव होणे, अस्वस्थता आणि दिवसातून अनेक वेळा उल्टी होणे अशी आहेत.

Russia Ukraine War
Indapur School Bus Accident : शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात! शिक्षक जागीच ठार; पाच ते सहा विद्यार्थी जखमी

युक्रेनने दावा केला आहे की, सैनिक युद्धापासून दूर जाण्यासाठी या आजाराचं कारणं देत असल्याचे रशियाकडून म्हटलं जात आहे. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, सध्या मोठ्या प्रमाणावर माऊस फिव्हर पसरत आहे, ज्यामुळे रशियन सैनिकांची युद्धत लढण्याची क्षमता कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर क्रेमलिनने मात्र रशियासमोर २२ महिन्यांपासून सुरू असलेलं हे युद्ध संपवण्यासाठी चर्चा करावी असा कुठलाच आधार नसल्याचे म्हटले आहे.

Russia Ukraine War
Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुढे काय होईल? भाजप-RSS बैठकीबद्दल जितेंद्र आव्हाडांचा 'एक्स'वर मोठा गौप्यस्फोट

युक्रेनचे लष्कराने रशियाच्या सैन्यावर हल्ला करत रशियाचे तीन रणगाडे उद्ध्वस्त केले आहेत. युक्रेनच्या माउंटन ब्रिगेडने रशियाच्या दोन आर्म्ड व्हेकल नष्ट केले आहेत. स्वातोवच्या जवळ युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या तळांवर फायरिंग देखील केली.

रशिया संरक्षणमंत्रालयाच्या माहितीनुसार युद्धात युक्रेनचे तब्बल ४ लाख सैनिक मारले गेले आहेत, तर १४० हून अधिक विमान नष्ट करण्यात आले आहेत. याखेरीज ७६६ टँक, २ हजारहून अधिक सेन्य वाहने नष्ट करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com