Russia Warship : युद्धाला दोन वर्षं होऊनही मागे हटत नाही युक्रेन; आता रशियाची युद्धनौका केली नष्ट! थरारक व्हिडिओ समोर

गेल्या महिन्यात रशियाची एक मोठी युद्धनौका काळ्या समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाली होती. मात्र ही दुर्घटना नसून, आपण केलेल्या हल्ल्यात ही नौका नष्ट झाल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.
Russia Warship
Russia WarshipeSakal

Ukraine Destroys Russia's Warship in Black Sea : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला या महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. छोटासा देश आहे, किती वेळ टिकेल? अशा सर्व प्रश्नांना तिलांजली देत युक्रेन अजूनही रशियाला तेवढ्याच जोमाने प्रतिकार करत आहे. या सगळ्यातच रशियासाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या महिन्यात रशियाची एक मोठी युद्धनौका काळ्या समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाली होती. मात्र ही दुर्घटना नसून, आपण केलेल्या हल्ल्यात ही नौका नष्ट झाल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. डिफेन्स ऑफ युक्रेनच्या एक्स हँडलवरून या हल्ल्याचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतंय की कशा प्रकारे एका जहाजावर ड्रोन हल्ला होत आहे. कित्येक मिसाईल्सचा मारा या जहाजावर होतोय. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, या जहाजाचं नाव 'इव्हानोव्हेट्स' असं होतं. या गाईडेड मिसाईल शिपवर सुमारे 40 रशियन सैनिक होते, असंही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. युक्रेनच्या हल्ल्यानंतर ही नौका पलटली आणि एका रात्रीतच समुद्रात पूर्णपणे बुडून गेली होती.

Russia Warship
Zuckerberg Apology : 'तुमचे हात रक्ताने माखलेत..', सिनेटरच्या आरोपांनंतर मार्क झुकरबर्गने मागितली पालकांची माफी! म्हणाला...

ही युद्धनौका सुमारे 60 ते 70 मिलियन डॉलर्स एवढ्या किंमतीची होती, असं युक्रेनच्या सुरक्षा दलांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच, त्यांनी आपल्या सैनिकांना शाबासकी देखील दिली आहे. दरम्यान, रशियाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com