Russia Ukraine War : मतदान सुरू असतानाच युक्रेनचे रशियामध्ये अनेक ठिकणी ड्रोन हल्ले!

Russia Ukraine War : रशियामध्ये अध्यक्ष निवडीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया संपत असतानाच युक्रेनने मॉस्को आणि इतर शहरांच्या परिसरात अनेक ड्रोनद्वारे हल्ला केला.
 Russia Ukraine War
Russia Ukraine War

मॉस्को, ता. १७ (पीटीआय) : रशियामध्ये अध्यक्ष निवडीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया संपत असतानाच युक्रेनने मॉस्को आणि इतर शहरांच्या परिसरात अनेक ड्रोनद्वारे हल्ला केला. रशियाच्या हवाई संरक्षण विभागाने सुमारे ३५ ड्रोन हवेतच नष्ट केले. या हल्ल्यात जीवित हानी झाली नसल्याचा दावा रशियाने केला आहे.

रशियामधील निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट असून विद्यमान अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांना आणखी सहा वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया आज संपली. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होत असतानाच युक्रेनने आज रशियातील विविध ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले केले. मॉस्को परिसरात चार ड्रोन पाडले गेले. तर, युक्रेनच्या सीमेपासून ८०० किमी अंतरावर असलेल्या यारोस्लाव्हल प्रांतातही ड्रोनचे हल्ले झाले.

 Russia Ukraine War
Electoral Bonds: निवडणूक रोख्यांसंदर्भातील नवीन माहिती आली समोर; आयोगाने वेबसाईटवर केली अपलोड

रशियात इतक्या आतपर्यंत ड्रोनद्वारे हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाने बेलगोरोद, कुर्स्क आणि रोस्तोव या युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या प्रांतांमध्ये ड्रोन हवेतच नष्ट केले. ड्रोन हल्ल्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, नष्ट झालेल्या ड्रोनचे तुकडे पडून काही इमारतींचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. क्रास्नोदर प्रांतात एका तेलशुद्धीकरण कारखान्यावर कोसळणारा ड्रोन पडून आग लागली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ती नियंत्रणात आणण्यात यश आले. युक्रेनने हल्ला करताना रशियातील तेलशुद्धीकरण कारखान्यांना प्रथमपासूनच लक्ष्य केले आहे.

 Russia Ukraine War
Electoral Bond: इलेक्टोरल बॉण्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांचा IT रेडशी काय संबंध? अर्थमंत्री सीतारामन यांनी दिलं स्पष्टीकरण

सीमेवरील शाळा बंद
युक्रेनकडून हल्ले वाढल्याने सीमेनजीक असलेल्या बोलगोरोद आणि परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि मॉल बंद ठेवण्याचे आदेश रशिया सरकारने दिले आहेत. युक्रेनने या शहरावर अनेकवेळा हल्ले केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com