युद्धभूमीवर रशियन सैनिकाला युक्रेनच्या नागरिकांनी दिलं खायला

russian soldier
russian soldier
Summary

युक्रेनच्या नागरिकांनी त्याला खायला दिलं आणि त्याचं त्याच्या आईशी फोनवरून बोलणंही करून दिलं.

किव्ह - रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात हजारो लोकांचा जीव गेला आहे. या युद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात असून रशियाने (Russia) हे युद्ध थांबवावं यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, रशियन सैनिकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल व्हायरल होत आहे. यात असा दावा केला जातोय की, रशियन सैनिकाने युक्रेनमध्ये (Ukraine) आत्मसमर्पण केलं होतं. यानंतर युक्रेनच्या नागरिकांनी त्याला खायला दिलं आणि त्याचं त्याच्या आईशी फोनवरून बोलणंही करून दिलं. आईसोबत बोलताना रशियन सैनिक रडायला लागल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं.

ट्विटरवर वॉल स्ट्रिट जर्नलच्या पत्रकाराने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने सांगितलं आहे की, युक्रेनमध्ये स्थानिक लोकांनी एका रशियन सैनिकाला पकडलं. तेव्हा उपाशी असलेल्या त्याला खायला दिलं. व्हिडिओमध्ये तो सैनिक काही खाताना दिसत आहे. तसंच तो चहा कॉफीसुद्धा पिताना दिसत आहे. यावेळी त्याला व्हिडिओ कॉलवरून आईशी संवाद साधण्यास मदत केली. तेव्हा आईशी बोलताना त्याला हुंदके अनावर झाले होते. या सैनिकाबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही, तसंच तो व्हिडिओ कधीचा आणि नेमका कुठला आहे हेसुद्धा समजू शकले नाही.

russian soldier
मैत्रीचे उदाहरण : रशियाच्या रॉकेटवर ‘तिरंगा’ कायम; मात्र...

व्हिडिओमध्ये रशियन सैनिकाच्या भोवतीने काही युक्रेनचे नागरिक उभा असलेले दिसतात. तसंच मागच्या बाजुला काही सैनिक दिसत आहेत. तिथेच एका महिलेनं तिच्या फोनवरून रशियन सैनिकाचे त्याच्या आईशी बोलणे घडवून आणले. रशियन जवान सतत हुंदके देताना दिसत आहे. एका बाजुला रशियन सैनिकांनी शहरं बेचिराख करून टाकली असताना युक्रेनच्या नागरिकांनी रशियन सैनिकाला केलेल्या मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com