esakal | संयुक्त राष्ट्रात नेपाळने उपस्थित केला सीमावादाचा मुद्दा
sakal

बोलून बातमी शोधा

kp oli sharma

भारताच्या शेजारी राष्ट्रांकडून सातत्याने सीमावादाचा मुद्दा पुढे केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर भाष्य करताना थेट भारताचे नाव घेत आरोप केल्यानंतर नेपाळनेदेखील सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला.

संयुक्त राष्ट्रात नेपाळने उपस्थित केला सीमावादाचा मुद्दा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांच्या 75 वी महासभा सध्या सुरु आहे. कोरोनाच्या संकटकाळात व्हर्च्युअल माध्यमातून आयोजन करण्यात आलेल्या या महासभेत भारताच्या शेजारी राष्ट्रांकडून सातत्याने सीमावादाचा मुद्दा पुढे केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावर भाष्य करताना थेट भारताचे नाव घेतले. तर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी कोणत्याच देशाचं नाव न घेता सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच केपी ओली यांनी कोरोनाबाबतही त्यांचे म्हणणे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडलं. 

भारत आणि नेपाळ यांच्यात गेल्या काही महिन्यात सीमा वादाचा मुद्दा समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात बोलताना नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता सीमावादावर वक्तव्य केलं. केपी ओली म्हणाले की, नेपाळची स्वायत्तता, प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करणं आणि शेजारी देशांसह जगातील इतर देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी कायम प्रतिबद्ध आहे. 

हे वाचा - काश्मीर दूरच तुमच्या ताब्यात असलेला भाग रिकामा करा; UN मध्ये भारताने पाकला खडसावलं

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत केपी ओली यांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलताना म्हटलं की, दैनंदिन जीवन, समाज आणि अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. लोकांना आजार आणि अन्न धान्याची टंचाई या दोन्हीचा सामना करावा लागत आहे. त्यांना वाचवणं सरकारचं पहिलं कर्तव्य होतं. कोरोनाला रोखण्यासाठी व्हॅक्सिनचा शोध सुरू आहे. मात्र व्हॅक्सिन सर्वसामान्यांपर्यंत कमी दरात पोहोचवण्यासाठी काय करता येईल हे पाहणं महत्वाचं असल्याचंही ओली म्हणाले. 

हे वाचा - UN महासभेत भारताने पाकला दाखवली जागा; इमरान खान यांच्या भाषणावेळी केलं वॉकआऊट

सध्या जगाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यात गरीबी, शस्त्र सज्जतेची स्पर्धा, देशांमधील सीमावाद, दहशतवाद, व्यापार, जागतिक विषमता, आपत्तींचे आव्हान यामुळे जगातील शांतता भंग होत आहे. तसंच विकासाच्या मार्गात अडथळे येत आहेत. कोरोना व्हायरसनं या सर्व संकटांचे गांभीर्य जगासमोर आणले असल्याचंही केपी ओली यांनी सांगितलं.