आकाशातून झाली विमानाच्या स्पेअर पार्ट्सची बरसात; फ्लाईटमध्ये होते 241 प्रवाशी अन्

ufo.
ufo.

वॉशिंग्टन- अमेरिकीच्या डॅनवेर शहरातमध्ये शुक्रवारी थोडासा वेगळा आणि दुर्मिळ प्रसंग पाहायला मिळाला. येथील ब्रुमफिल्ड रहिवाशांनी काहीतरी विचित्र घडत असल्याचा अनुभव घेतला. येथील भागात अचानक काही यांत्रिक भाग आकाशातून पडू लागले. त्यामुळे लोकांची एकच तारांबळ उडाली. अचानक आकाशातून काही विचित्र यांत्रिक भाग पडू लागले आणि त्यांच्या पडण्यामुळे जोराचा आवाज येऊ लागला. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी यूएफओ  क्रॅश झाल्याचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली होती. 

अचानक अवकाशातून पडणाऱ्या या यांत्रिक भागांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रविवाशांनी तात्काळ पोलिस, अग्निशमन दलाला फोन करुन बोलावून घेतले. काही काळ पोलिसांनाही काय घडतंय कळालं नाही. शेकडो लोक रस्त्यावर जमा झाले होते. काही वेळाने या प्रकारामागचा खुलासा झाला. परिसरातून उड्डान केलेल्या एका विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर त्याचे अनेक भाग जमिनीवर पडले  होते. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. 

युनायटेड एअरलाईन्सचे एक विमान होनोलुलूसाठी उड्डान केले होते. पण, विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे काही काळाने निष्पन्न झाले. त्यामुळे विमानाला डॅनवेर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवावे लागले. मात्र, यादरम्यान विमानाचे अनेक भाग विमानापासून अलग झाले आणि परिसरात पडले. विमानाने उड्डान केले त्यावेळी त्यात 231 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर होते. सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत. 

Boeing 777 विमानाला इंजिनमधील काही तांत्रिक कारणामुळे आपात्कालीन लँडिग करावी लागली. पण, यावेळी अनेक यांत्रिक भाग विमानापासून वेगळे झाले. अनेक ठिकाणी हे भाग पडले होते. सुरुवातीला रहिवाशांना काय घडतंय हे कळालं नाही. पण, लवकरच याचा खुलासा झाला. यांत्रिक भागामुळे कसलीही जीवितहानी झालेली नाही, पण मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com