अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोने २१ मार्चपर्यंत निर्बंध वाढवले

पीटीआय
Sunday, 21 February 2021

जगभरात लसीकरण मोहीम सुरू असताना अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोने २१ मार्चपर्यंत निर्बंध वाढवले आहेत. नव्या निर्बधानुसार कोविड मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूयॉर्क - जगभरात लसीकरण मोहीम सुरू असताना अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोने २१ मार्चपर्यंत निर्बंध वाढवले आहेत. नव्या निर्बधानुसार कोविड मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार कामाशिवाय कोणालाही प्रवास करता येणार नाही. प्रवासाचे कारण सांगावे लागणार आहे. हे निर्बंध २१ फेब्रुवारीपर्यंतच होते. परंतु आता महिनाभराने वाढ करण्यात आली. 

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जुलैपर्यंत प्रत्येक नागरिकाला लस दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक ५.७० कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन असून तेथे चार कोटी तर युरोपियन युनियनमध्ये आतापर्यंत २.४५ कोटी नागरिकांना लस दिली आहे. भारतात १.०४ कोटी नागरिकांना डोस दिले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कॅनडात कोरोनाचा कहर
ओटावा: लसीकरण कार्यक्रमात पिछेहाटीचा सामना करणाऱ्या कॅनडात संसर्गाची लाट तीव्र झाली. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नागरिकांना कोविडच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारची निष्काळजी धोकादायक ठरु शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोनाचा तिसरा टप्पा हा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे. कॅनडाच्या प्रत्येक राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून येत असून तो चिंताजनक आहे. कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने ८ मार्चपर्यंत कोरोनाचा तिसरा टप्पा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

Video: चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं गलवान संघर्षाचा व्हिडिओ शेअर केला अन् चीनचं पितळ पडलं उघडं!

कोरोना अपडेटस्
ब्रिटनमध्ये कोविड प्रतिबंधक लशींचा अधिक साठा झाल्यास त्याचा पुरवठा गरीब देशांना केला जाईल, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टानिओ गुंटरेस यांनी श्रीमंत देशांकडे लशींचा गरजेपेक्षा अधिक साठा असल्याचे म्हटले होते. 

कोरोनानंतर आता नवा धोका! रशियात बर्ड फ्ल्यूच्या नव्या विषाणूचं माणसामध्ये संक्रमण

ब्रिटन नागरिकांना पर्यटक म्हणून येण्यास कोणतिही हरकत नसल्याचे ग्रीस सरकारने आज स्पष्ट केले आहे. मात्र त्यांच्याकडे व्हॅक्सिन पासपोर्ट असणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. व्हॅक्सिन पासपोर्ट याचा अर्थ पर्यटकांना लस घेतल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United States Canada and Mexico extended sanctions until March 21