esakal | उइकर मुस्लिमांवर चीनचा अत्याचार; अमेरिकेची मोठी कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

China and America

चीनमध्ये उइगर समुदाय आणि अन्य मुस्लिम अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायामुळे अमेरिकेने चीनबाबत अधिक कठोर पावले उचलली आहेत.

चीनला दणका; आणखी 14 कंपन्या अमेरिकेच्या काळ्या यादीत

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन-चीनमध्ये उइगर समुदाय आणि अन्य मुस्लिम अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायामुळे अमेरिकेने चीनबाबत अधिक कठोर पावले उचलली आहेत. अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने आणखी १४ कंपन्यांवर व्यापार निर्बंध लागू केले असून त्यांचा समावेश काळ्या यादीत केला आहे.अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, चीनमधील उइगर आणि मुस्लिम समाजाच्या शोषणात या कंपन्यांचा कथित हात असल्याने अमेरिकेने ही कारवाई केली आहे. (US aggressive against China Another 14 companies are blacklisted uighur muslims)

चीनमधील झिंजियांग प्रांतातील मुस्लिम अल्पसंख्याकांविरोधात दडपशाही, सामूहिक नजरकैद आणि उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे लक्ष ठेवण्यासाठी चीनला इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान आणि अन्य कंपन्यांनी मदत केली आहे. अशा कंपन्यांना साहित्य अथवा कोणतीही उपकरणे विकण्यास अमेरिकी नागरिकांवर बंदी घातली आहेत. उइगर नागरिकांवरील अत्याचाराविरोधात चीनवर लादलेल्या आर्थिक आणि व्यापारी निर्बंधातील ही नवी कारवाई आहे. चीनमधील या कंपन्या रशियातील सैन्यदलाच्या मोहिमा किंवा आण्विक विकास प्रतिबंध कार्यक्रम अथवा इराणवरील आर्थिक बंदीचे उल्लंघन करण्यासाठी मदत करीत होत्या, असा आरोपही वाणिज्य विभागाने केला आहे.

हेही वाचा: चीनला आम्ही अफगाणिस्तानचा मित्र मानतो- तालिबान

दरम्यान, गेल्या अनेक दशकांपासून चीन उइगर मुस्लिमांचा छळ करत आला आहे. उइगर मुस्लिम स्वत:चा स्वतंत्र देश स्थापन करु पाहात आहेत, असं म्हणत चीनने त्यांच्यावर उत्याचार सुरु केले आहे. त्यांची सांस्कृतिक ओळख नष्ट करण्यासाठी चीन सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहे. शिंजियांगमध्ये मोठ्या संख्यने मुस्लिमांना डिंटेशन सेंटरमध्ये ठेवलं गेलं आहे. इथे त्यांना मोठ्या प्रमाणावर शारिरीक छळाला सामोरो जावे लागते. दाढी वाढवणे, उपवास करणे आणि कुरान वाचणे या साऱ्या कृतींना संशयास्पद मानलं जातं. अशा लोकांना डिटेंशन सेंटरमध्ये नजरकैद करुन ठेवलं आहे.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

इस्लामी प्रभावाच्या विरोधात चीनने आतापर्यंत अनेक मशिदींना आणि इस्लामी इमारतींना नष्ट केलं आहे. हजारोंच्या संख्येने उइगर मुस्लिम आजही डिटेंशन सेंटरमध्ये कैद आहेत. चीनमध्ये अनेक मशिदीचे घुमट नष्ट करण्यात आले आहेत. चीनच्या अधिकाऱ्यांनी देशभर असे घुमट उद्ध्वस्त करण्याची मोहीमच चालवली आहे. उइगर मुस्लिमांचा वंशच्छेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका होत आहे. उइगर मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजातील महिलांची सातत्याने गर्भचाचणी केली जाते, बळजबरीने नसबंदी करणे आणि प्रसंगी गर्भपातही करणे, असे प्रकार चीन सरकारकडून सुरू आहेत.

loading image