ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा पेच; 'न्यूक्लिअर फूटबॉल' बायडेन यांना मिळण्यात अडचण

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 21 January 2021

 न्यूक्लियर फूटबॉल कायम अमेरिकेच्या राष्ट्रपतीसोबत असतो.

नवी दिल्ली- न्यूक्लियर फूटबॉल कायम अमेरिकेच्या राष्ट्रपतीसोबत असतो. याद्वारे राष्ट्रपती कोणत्याही वेळी न्यूक्लियर हल्ल्याचा आदेश देऊ शकतात. अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूक्लियर फूटबॉल नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांना द्यावा लागणार आहे. पण, ट्रम्प यांचा स्वभाव पाहता ते सहजासहजी न्यूक्लियर फूटबॉल देतील असं वाटत नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 

काही तासांमध्ये ज्यो बायडेन राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्यानंतर चार वर्षांसाठी बायडेन व्हाईट हाऊसचे रहिवाशी होतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. ते फ्लोरिडाला रवाना होणार आहेत. यावेळी न्यूक्लियर फूटबॉल त्यांच्यासोबतच असणार आहे. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांना वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे. 

राजपथावर अवतरणार संतांची मांदियाळी; प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचं वैभव...

सुरक्षा एक्सपर्ट स्टीफन स्वार्ट्स यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेमध्ये एकसारखेच 3 ते 4 न्यू्क्लियर फुटबॉल आहे. एक राष्ट्रपतींकडे असतो, दुसरा उपराष्ट्रपतीकडे आणि तिसरा आपत्कालीन परिस्थितीत पद सांभळणाऱ्या व्यक्तीकडे दिला जातो. त्यामुळे बायडेन यांना अन्य न्यूक्लियर फूटबॉल सूटकेस मिळू शकतो. 

अमेरिकेच्या राष्ट्रपतींसोबत नेहमी 'न्यूक्लियर फूटबॉल' असतो. याला Presidential Emergency Satchel म्हटलं जातं. त्यांच्यासोबत एक व्यक्तीही असतो, जो आवश्यकता पडल्यास आण्विक हल्ला करण्यासाठी तयार असतो. जेव्हा अमेरिकी राष्ट्रपती व्हाईट हाऊसच्या बाहेर जातात, तेव्हा त्यांच्यासोबत हा फुटबॉल नक्की असतो. 

1962 मध्ये क्यूबन मिसाईल संकट काळात तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांनी आपल्यासोबत हा फुटबॉल बाळगला होता. तेव्हापासून हा फुटबॉल प्रत्येक अमेरिकी राष्ट्रपतीसोबत असतो. अमेरिकी राष्ट्रपतींना प्रत्येकवेळी आण्विक युद्धासाठी तयार ठेवणे याचे उद्धिष्ट आहे. असे एकूण तीन बॅग आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि व्हाईट हाऊसमध्ये ते असतात. 'न्यूक्लियर फूटबॉल'चे रक्षण करण्यासाठी वेगळे कर्मचारी तैनात केलेले असतात. 

"महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अज्ञानी, मातोश्रीचा पिंजरा सोडून बाहेर पडेना...

काय आहे फुटबॉल?

'न्यूक्लियर फुटबॉल'बद्दलची अधिकची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. 'फुटबॉल' ही एक बॅग असते. ही जगातील सर्वात शक्तीशाली बॅग आहे, कारण यामध्ये जगाचा नाश करण्याची क्षमता आहे. यात, अमेरिकेच्या अणु हल्ल्याचा लाँच कोड असतो. म्हणूनचा याला 'न्यूक्लियर फूटबॉल' म्हटलं जातं. या बॅगमधील एका डायरीत अणु हल्ल्याची योजना, टार्गेट याची माहिती लिहिलेली असते. 

बॅगमध्ये आहे एक बिस्किट

आणखी एका काळ्या रंगाच्या डायरीवर हल्ला झाल्यास लपण्याची माहिती देण्यात आली आहे. या बॅगमध्ये एक बिस्किटही असतं. हे खाईचं बिस्किट नसून यावर अणु हल्ल्यासाठी कोड लिहिलेला असतो. बॅगला एक अँटिनाही लावलेला असतो, ज्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष जगातील कोणत्याही भागात संपर्क साधू शकतात. बॅगमध्ये जगाचा नकाशाही असतो, ज्यामुळे हल्ला नेमका कोठे करायचा हे अध्यक्षांना कळतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us america donald trump will not give nuclear bomb to joe biden