US Election : ट्रम्प चेकमेट झाले तर 28 वर्षांचा मोडेल रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

ट्रम्प हारले तर कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला असतील ज्या अमेरिकेच्या राजकारणात इतक्या उंचीवर पोहोचलेल्या असतील.

वॉशिंग्टन : पुढच्या महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राजकारणाला चांगलाच रंग चढला आहे. सध्या अमेरिकेत प्रेसिडेंन्शियल डिबेट्स आणि प्रचार सभांची रेलचेल सुरु आहे. मात्र, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बहुतांश निवडणुकाच्या सर्व्हेमध्ये डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. जर डोनाल्ड ट्रम्प तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये हारले तर गेल्या 28 वर्षांचा रेकॉर्ड तुटणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मध्ये डेमोक्रॅटीक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना हारवून राष्ट्राध्यक्ष पद मिळवले होते.

हेही वाचा - USमधील बेरोजगारीचं खापर 'बायडेन'माथी, बायडेन जिंकले तर समजा चीन जिंकला

काय आहे हा रेकॉर्ड? 
जर डोनाल्ड ट्रम्प हारले तर 1992मध्ये जॉर्ज बुश सिनियर यांच्यानंतर ते पहिले राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरा कार्यकाळ मिळणार नाही. सिनीयर बुश आपल्या पहिल्या कार्यकाळानंतर 1992 सालच्या निवडणुकीत हारले होते. त्यानंतर डेमोक्रॅट बिल क्लिंटन, रिपब्लिकन जॉर्ज बुश आणि डेमोक्रॅट बराक ओबामा आठ-आठ वर्षे म्हणजे दोन कार्यकाळांसाठी राष्ट्राध्यक्ष राहीलेले आहेत. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 

बायडेन यांच्या विजयाने आणखी एक रेकॉर्ड
78 वर्षांच्या बायडेन यांनी जर बाजी मारली तर एक 32 वर्षे जुन्या रेकॉर्डची पुनरावृत्ती होईल. ते जॉर्ज बुश सिनीयर यांच्या एका रेकॉर्डची पुनरावृत्ती करतील. 1988 मध्ये राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी बुश सिनीयर हे त्यांचे राष्ट्राध्यक्ष असले्लया रोनाल्ड रीगन यांच्या कार्यकाळात आठ वर्षे उपराष्ट्राध्यक्ष होते. तेंव्हा अमेरिकेच्या इतिहासात 152 वर्षांनंतर असं घडलं होतं की कुणीतरी आठ वर्षे उपराष्ट्राध्यक्ष राहील्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदी गेलं होतं. बायडेन हे बराक ओबामा यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात उपराष्ट्राध्यक्ष राहीले होते. 

हेही वाचा - US Election : अंतिम डिबेटचा आखाडा सजला; कोरोनासह राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर रंगणार चर्चा

तर भारतीय वंशाची महिला पहिल्यांदाच बनेल उपराष्ट्रध्यक्ष
डेमोक्रॅट पक्षाकडून उभे असलेले जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. जर जो बायडेन 2020 ची ही निवडणुक जिंकले तर उपराष्ट्रध्यक्षपदी कमला हॅरिस यादेखील एक इतिहास रचतील. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला असतील ज्या अमेरिकेच्या राजकारणात या उंचीवर पोहोचलेल्या असतील. हॅरिस या कॅलिफोर्नियाच्या सिनेटर आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Election if donald trump loses new record happen joe biden kamala harris