अमेरिकनं आर्मीकडून चिनूक हेलिकॉप्टर्सचा ताफा ग्राऊंड; भारताची चिंता वाढली!

चिनूक हेलिकॉप्टर्स काय आहेत? भारताशी त्याचा संबंध काय? जाणून घ्या
chinook helicopter
chinook helicopter

नवी दिल्ली : अमेरिकेच्या लष्करानं आपल्या चिनूक हेलिकॉप्टर्सचा ताफा ग्राऊंड (मागे घेण्याचा) करण्याचा निर्णय घेतला आहे. या हेलिकॉप्टर्सच्या इंजिनामध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या, या पार्श्वभूमीवर अमेरिकन लष्करानं हा निर्णय घेतला आहे. पण यामुळं भारताची चिंता वाढली असून अमेरिकेकडं या निर्णयाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. (US ground fleet of Chinook helicopters CH 47 India concern increased)

अमेरिकन संरक्षण उत्पादक कंपनी बोईंगकडून चिनूक हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाते. भारतीय हवाई दलानं या कंपनीकडून १५ चिनूक हेलिकॉप्टर्स विकत घेतली आहेत. मार्च 2019 मध्ये ही हेलिकॉप्टर्स सेवेत समाविष्ट केली गेली. ही हेलिकॉप्टर्स भारताकडून उत्तरेकडील ऑपरेशन्ससाठी लडाखमध्ये तर ईशान्येकडील भागांची काळजी घेण्यासाठी दुसरे युनिट आसाममध्ये तैनात आहे.

chinook helicopter
गणेशोत्सवाने घालवली प्राजक्ताच्या मनातली ही भीती...

दरम्यान, यूएस आर्मी मटेरिअल कमांडने 70 पेक्षा जास्त चिनूक सीएच ४७ हेलिकॉप्टरची तपासणी करताना मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगून फ्लीट ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला. या हेलिकॉप्टर्सच्या इंजिनात आग लागण्याच्या घटनांमुळं हा ग्राउंडिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळं भारताची चिंता वाढली आहे. कारण याचा धोका भारतीय जवानांना देखील सोसावा लागू शकतो म्हणून भारतानं यासंदर्भातील सविस्तर अहवाल अमेरिकेकडं मागवला आहे.

chinook helicopter
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

अमेरिकन लष्कराच्या ताफ्यात 400 हेलिकॉप्टर्स

यूएस मीडियाच्या वृत्तानुसार, इंजिनला आग लागण्याच्या जोखमीमुळे अमेरिकन सैन्याने CH-47 चिनूक हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफा ग्राउंड केला. वॉल स्ट्रीट जर्नलने यूएस आर्मी अधिकार्‍यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, त्यांना हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये आग लागीच्या घटना घडल्या आहेत. या घटना किरकोळ असल्यामुळं त्यात कोणाला दुखापत किंवा मृत्यू झालेला नाही. अमेरिकन लष्कराच्या ताफ्यात ही सुमारे 400 हेलिकॉप्टर आहेत.

chinook helicopter
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

हेवी-लिफ्ट युटिलिटी हेलिकॉप्टर

चिनूक हे हेवी-लिफ्ट युटिलिटी हेलिकॉप्टर आहे. जे नियमित आणि विशेष सैन्य दलांद्वारे वापरले जाते. चार डझनहून अधिक सैन्य किंवा मालवाहतूकही याद्वारे केली जाऊ शकते. सहा दशकांपासून या हेलिकॉप्टरनं अमेरिकन लष्कराच्या ताफ्यात एक प्रमुख स्थान पटकावलं आहे. चिनूक हेलिकॉप्टर बोईंग या एरोस्पेस कंपनीनं बनवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com