'कोरोनाजन्य परिस्थितीत भारताची जमीन बळकावण्याचा चीनचा डाव'

वृत्तसंस्था
Wednesday, 22 July 2020

भारत-चीन यांच्यातील सीमारेषेवरील तणावाला चीन कारणीभूत असल्याचा उल्लेख विधेयकात करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनने भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली.

 
कोरोनाजन्य परिस्थितीचा फायदा उठवण्याच्या इराद्याने चीन भारताची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप अमेरिकेने चीनवर केलाय. अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरणाने यासंदर्भातील विधेयक संमत केले आहे. यात गलवान खोऱ्यात भारताविरुद्ध चीनने केलेले आक्रमण तसेच दक्षिण चीन सागरी विवादीत क्षेत्रसंदर्भातील विस्तारवादाच्या चीनच्या मानसिकतेवरही निशाणा साधलाय. कोरोना प्रादुर्भावाचा फायदा घेऊन चीन भारताच्या हक्काची जमीन बळकावण्याचा कट आखत असल्याचे अमेरिकेने म्हटलंय.  अमेरिकन प्रतिनिधी सभेने चीनच्या विस्तारवादी मानसिकतेवर चिंता व्यक्त केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, दक्षिण समुद्र परिसर, सेनकाकू सारख्या वादग्रस्त बेटांवर चीनचा विस्तारवाद आणि आक्रमक धोरण हे मुद्दे चिंता वाढवणारे आहेत. एनडीएए संशोधनातून भारतातील गलवान खोऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवरही चीनवर निशाणा साधण्यात आलाय. 

बिहारमध्ये आता राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी भाजपची नवी खेळी...  

भारत-चीन यांच्यातील सीमारेषेवरील तणावाला चीन कारणीभूत असल्याचा उल्लेख विधेयकात करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी चीनने भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली. भारताचा प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण चीन सागर परिसरातही क्षेत्रीय दावा मजबूत करण्याचा प्रयत्न चीनकडून सुरु आहे. 15 जूनपर्यंत एलएसीवर ५ हजार सैनिक तैनात होते, असा उल्लेखही सुधारित कायदा विधेयकात करण्यात आला आहे. भारतीय अमेरिकी खासदार एमी बेरा यांच्यासह काँग्रेस सदस्य स्टीव शॅबेट यांनी सुधारित कायदा विधेयक सादर केले. भारत-चीन यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही अमेरिकन प्रतिनिधी सभेने म्हटले आहे.

सभागृहांच्या दिवासाआड बैठकांचा पर्याय

मागील काही महीन्यांपासून लडाख परिसरातीलन चीनच्या कुरापती सुरु आहेत. चीनच्या हालचालीनंतर भारतानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वीही अनेकदा अमेरिकेने उघड उघड भारताची बाजू घेत चीनला धारेवर धरले आहे. कोरोना विषाणूनं जगभरात घातलेल्या थैमानामुळे अनेक राष्ट्रांनी चीनविरोधात संताप व्यक्त केलाय. त्यामुळे चीनच्या विस्तारवादात अनेक राष्ट्रे एकत्र लढण्याचे संकेत देत चीनवरील दबाव  वाढवत असल्याचे चित्र आंतरराष्ट्रीय राजकारण निर्माण झाल्याचे दिसते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US House of Representatives pass NDAA amendment bill blaming China to occupy Indian land amid corona crisis