भारतातल्या एनआरसी कायद्याला अमेरिकतल्या नेत्याचाही विरोध!

वृत्तसंस्था
Sunday, 28 June 2020

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन हे भारत सरकारच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) यांच्या विरोधात असून, त्यांनी काश्‍मीरमधील नागरिकांचे हक्क त्यांना मिळावेत, अशी मागणीही सरकारकडे केली आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन हे भारत सरकारच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) यांच्या विरोधात असून, त्यांनी काश्‍मीरमधील नागरिकांचे हक्क त्यांना मिळावेत, अशी मागणीही सरकारकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बिडेन यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी बिडेन यांनी आपला अजेंडा जाहीर केला असून त्यामध्ये मुस्लिम-अमेरिकी समुदायासाठीही विशेष धोरण आखले आहे. भारताबद्दलही त्यांची विशिष्ट मते आहेत. ‘काश्‍मीरमध्ये भारत सरकारने स्थानिक नागरिकांना त्यांचे सर्व अधिकार मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शांततामय आंदोलनांवर आणि इंटरनेट वापरावर बंदी घातल्याने लोकशाही कमकुवत होते, असे बिडेन यांच्या अजेंड्यात म्हटले आहे. ‘एनआरसी’ची अंमलबजावणी आणि ‘सीएए’बाबत ईशान्य भारतात झालेली आंदोलने हा चिंतेचा विषय असून भारताच्या धर्मनिरपेक्षतावादी धोरणाला हे अनुसरून नाही, असे बिडेन यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली; लष्कराने हॉस्पिटलना दिले आदेश 

डेमॉक्रॅटिक पक्षातील एक प्रभावशाली गट भारतातील गेल्या वर्षातील काही घटनांमुळे नाराज आहे. मात्र, भारतही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांनी जम्मू-काश्‍मीरमधील सर्व निर्बंध उठविण्याबाबत त्यांच्या संसदेत ठराव मांडला होता. या जयपाल यांचा समावेश परराष्ट्र धोरणविषयक समितीत केल्याचे समजताच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या समितीबरोबर नियोजित असलेली बैठक रद्द केली होती आणि त्यामुळे अमेरिकेला धक्का बसला होता.

खरेदी करून 20 मिनिटं होण्याआधी कोट्यवधींच्या कारची अशी झाली अवस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US leader also opposes NRC law in India