अमेरिका आणि चीनमधील संबंध 'पांडा' सुधारणार; काय आहे जिनपिंग यांची कुटनीती?

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिका दौरा केला आहे. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये चार तासांची बैठक झाली. यावेळी जिनपिंग यांनी अमेरिकेला नवे पांडा देण्याचे संकेत दिले आहेत.
 panda diplomacy
panda diplomacy

वॉशिंग्टन- चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिका दौरा केला आहे. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये चार तासांची बैठक झाली. यावेळी जिनपिंग यांनी अमेरिकेला नवे पांडा देण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी ते म्हणाले की, पांडा चिनी आणि अमेरिकी लोकांमध्ये मैत्रीचा एक दूत आहे.

चीनने नुकतेच तीन पांडा अमेरिकेतून परत बोलावले आहेत. चीन आणि अमेरिकीमधील संबंध तणावाचे आहेत. अशावेळी जिनपिंग पांडा डिप्लोमेसीच्या माध्यमातून संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय.

 panda diplomacy
Diwali 2023: टपालाने फराळाचा दरवळला सुगंध! अमेरिका, ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक पार्सल; 17 दिवसांत 3 कोटींचा महसूल

पांडा बनणार मैत्रीचा पूल

१९७२ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा केला होता. यावेळी त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी पैट निक्सन या देखील होत्या. चीनचे अध्यक्ष झोऊ एन-लाई यांनी अमेरिकेला दोन पांडा भेट म्हणून दिले होते. याबदल्यात अमेरिकेने चीनला दोन मस्क ऑक्सेन (कस्तुरी बैल) दिले होते.

चीनची पांडा डिप्लोमसी

चीनने नंतरही काही पांडा अमेरिकेला दिले होते. पण, ते भाड्याने दिले होते. यासाठी चीन दरवर्षी ५ ते १० लाख डॉलर आकारत होता. पांडा एक क्यूट आणि प्रेमळ प्राणी आहे. या प्राण्याच्या माध्यमातून चीन आपली इमेज एक मैत्रीपूर्ण देश म्हणून समोर ठेवू पाहात आहे. चीनने कॅनडा, फ्रान्स आणि ऑस्ट्रलिया या देशांना देखील पांडा दिला आहे. तसेच सिंगापूर, मलेशिया आणि थायलँड यांच्यासोबत पांडाच्या बदल्यात फ्री-ट्रेड अॅग्रिमेंट केला आहे.

 panda diplomacy
Nijjar killing: निज्जरच्या हत्येमागे चीन, भारत आणि पश्चिमी देशात भांडण लावण्याचा प्लॅन; पत्रकाराच्या आरोपाने खळबळ

चीनचा काय आहे प्लॅन?

चीनने पांडा दिले तरी ते करार संपल्यानंतर परत करावे लागतात. तसेच विदेशात जन्मलेल्या पांडावर देखील चीन हक्क सांगतो. यावरुन अमेरिकीच्या राजकीय पक्षांमध्ये अनेकदा चर्चा झडल्या आहेत. प्राणी संग्राहलयात हे पांडा ठेवण्यासाठी मोठा खर्च येतो. तसेच चीन या पांडाना परत बोलावून देखील घेतो. त्यामुळे याच्या उपयुक्ततेबाबत अमेरिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

पांडाची आवश्यकता कशासाठी?

पांडांना प्राणी संग्राहलयात ठेवल्याने चांगली कमाई होते. पांडा दिसायला खूप निरागस असतात. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोक प्राणी संग्राहलयात मोठ्या प्रमाणात येत असतात. चीनकडे सर्वाधिक पांडा आहेत. माहितीनुसार, जगात केवळ १८०० पांडा आहेत. अमेरिकेकडे सध्या चार पांडा आहेत. ते देखील चीनला परत करावे लागणार आहेत. त्यामुळे चीनने अमेरिकेला पांडा देण्याच्या बहाण्याने वेगळा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com