गलवान खोऱ्यात जे घडलं ते चीनने ठरवूनच केलं; US अहवालातून शेजाऱ्याचा खोटारडेपणा उघड

सुशांत जाधव
Saturday, 18 July 2020

गलवान खोऱ्यात दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये झालेल्या वादामध्ये 20 जवान हुतात्मा झाले होते. या घटनेनंतर भारतात चीन विरोधी लाट उसळली. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात मोहिम राबवली गेली.

पूर्व लडाख परिसरातील गलवान परिसरात पेट्रोलिंग पाइंट 14 जवळ भारत-चीन सैन्यात घडलेला हाणामारीचा प्रकारामुळे दोन्ही देशात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. गलवान खोऱ्यात घडलेली घटना ही चीनने ठरवून केल्याचे समोर येत आहे. या परिसरात सैन्य तैनात करुन चीन दक्षिण आशियाई देशातील क्षेत्र आपले असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न होता. अमेरिकन न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टने काही पुराव्यानिशी चीनचा विस्तारवादाची पोलखोल केली आहे. गलवानमधील घटनेनंतर वादग्रस्त मुद्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांतील उच्चस्तरिय लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकाही पार पडल्या. त्यानंतर लडाख सीमेवरुन चीनचे सैन्य दो-चार पावले मागे सरकले अशा बातम्या आल्या तर  कधी चीनची कुरघोडी सुरुच असल्याचे वृत्तही झळकले.

भारतात गरीबी कमी झाली; संयुक्त राष्ट्राचा अहवाल​

गलवान खोऱ्यात दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये झालेल्या वादामध्ये 20 जवान हुतात्मा झाले होते. या घटनेनंतर भारतात चीन विरोधी लाट उसळली. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात मोहिम राबवली गेली. भारत सरकारनेही जन मानसातील आक्रोश लक्षात घेत चीनी कंपनीच्या अ‍ॅपवर बंदी घालण्याच कठोर निर्णय घेतला. लडाखमधील घटनाही चीनच्या विस्तारतावादाच्या मानसिकतेतून झाल्याचे भारताला वाटते. भारत याकडे त्याच नजरेने पाहत आहे, असे अमेरिकन न्यूजचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ता पॉल डी शिंकमॅम यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षपणे युद्धाची भाषा न करता शेजारील राष्ट्रांची अर्थव्यवस्था दुबळी करुन विस्तारवाद करण्यावर चीन भर देत आहे. काही विश्लेषक आणि रिसर्चमधून या गोष्टी समोर आल्या आहेत, असे शिंकमॅम यांनी म्हटले आहे.

एक नंबर! शेतकऱ्याच्या मुलाला आली अमेरिकेतील विद्यापीठाची ऑफर!

दक्षिण चीन सागरी समुद्र आणि हाँगकाँगसह अन्य सीमालगत भागात चीन दावा करत असलेल्या भूभागासंदर्भातील विश्लेषणातून चीनच्या विस्तारवादी मानसिकता समोर येत आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले जागतिक संकट हे चीनची कुरघोडी असल्याचेही काही विश्लेषकांचे मत आहे. दक्षिण-पश्चिम सीमेलगतचा भूभाग जो प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणून ओळखला जातो त्यावर कब्जा करण्याचा चीन प्रयत्नशील असल्याचे भारताचे मत आहे, असेही शिंकमॅन यांनी म्हटले आहे. भारत-चीन यांच्यातील वाद यापूर्वीही समोर आला होता. 2010 आणि 2014 मध्ये दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यात अशीच झडप झाली होती. 2017 मध्ये डोकलाममध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला होता.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Report says Galwan Valley skirmish is part of broader expansionist campaign of China