esakal | 206 वर्षांपूर्वीही पेटली होती 'कॅपिटॉल'; अमेरिकेच्या संसदेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

capitol history

ट्रम्प पराभूत झाले होते. मात्र त्यांनी निकाल मान्य नसल्याचे जाहीर केले होते. अर्थात सुरक्षा दलाने ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पहावयास हवे होते.म्हणजे ही घटना टळली असती.

206 वर्षांपूर्वीही पेटली होती 'कॅपिटॉल'; अमेरिकेच्या संसदेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन - पराभव स्वीकारण्याचा खिलाडूपणा न दाखविणाऱ्या ट्रम्प यांच्या समर्थकांनी आज अमेरिकी काँग्रेसची इमारत असलेल्या ‘कॅपिटॉल’वर हल्ला करत अध्यक्षीय निवडणूकीच्या मतमोजणी प्रक्रियेत अडथळे आणले. यावेळी पोलिसांबरोबर संघर्ष होऊन त्यात चार जणांचा बळीही गेला. अखेर, विवेकबुद्धी शाबूत ठेवत उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी प्रक्रिया पूर्ण करत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे विजयी झाल्याचे घोषित केले.

बुधवारी बायडेन यांच्या विजयाला घटनात्मक वैधता दिली जाणार होती. संसंदेच्या दोन्ही सभागृहात इलेक्टर्सच्या मतांची मोजणी होणार होती. अमेरिकेत निवडणूक निकालाला आव्हान देता येते. मात्र त्याचा निपटारा ६ जानेवारीपूर्वीच करणे गरजेचे आहे. हे सर्वकाही पार पडले. नंतर संसंद भरली. त्यांनी चार सदस्य निवडले. ते इलेक्ट्ररचे नाव घेऊन कोणी मत कोणाला दिले, हे सांगत होते. यात बायडेन यांचे पारडे जड होतेच. परिणामी ट्रम्प यांनी पराभव मान्य केला.

हे वाचा - ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची मागणी, रिपब्लिक नेतेही गेले विरोधात

ट्रम्प यांची सहकाऱ्यांवर टीका
सत्ता जाण्याची वेळ येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपल्या सहकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त अधिवेशनाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले देशाचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी इलेक्टोरल मते बाद ठरवून ज्यो बायडेन यांना विजयी झाल्याचे अमान्य न केल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. पेन्स यांच्यात धाडसच नाही, अशी टीका त्यांनी केली. नियमानुसार आजची मतमोजणी पेन्स यांच्या उपस्थितीतच झाली. त्यांनी ही मते बाद ठरवावीत, अशी ट्रम्प यांची इच्छा होती. मात्र, पेन्स यांनी तसे करण्यास स्पष्ट नकार देतानाच असे करण्याचा आपल्याला आणि ट्रम्प यांनाही अधिकार नसल्याचे आधीच सांगितले होते. 

इशारा समजला असता तर
३ नोव्हेंबरला मतदान झाले. अमेरिकी जनतेकडून इलेक्टर्सची निवड होते आणि हेच इलेक्टर्स अध्यक्षाची निवड करतात. त्यांचे एकूण ५३८ मते असतात. अध्यक्षपदासाठी २७० मतांची गरज भासते. ३ नोव्हेंबरच्या मतदानानंतर बायडेन यांना ३०६ आणि ट्रम्प यांना २३२ मते मिळाली. याचाच अर्थ ट्रम्प पराभूत झाले होते. मात्र त्यांनी निकाल मान्य नसल्याचे जाहीर केले होते. अर्थात सुरक्षा दलाने ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पहावयास हवे होते.म्हणजे कालची घटना टळली असती.

हे वाचा - चीनच्या दादागिरीला लागणार लगाम; अमेरिका-जपानची युरोपिय देशांच्या मदतीने रणनीती

206 वर्षांनी कॅपिटॉलवर हल्ला
अमेरिकन कॅपिटल हिस्टॉरिकल सोसायटीचे संचालक सॅम्युअल हॉलिडे यांनी सांगितलं की, याआधी 24 ऑगस्ट 1814 मध्ये ब्रिटनने अमेरिकेवर हल्ला केला होता. अमेरिकेच्या लष्कराचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिश सैनिकांनी युएस कॅपिटलमध्ये आग लावली होती. तेव्हापासून गेल्या 206 वर्षांच्या इतिहासात असा हल्ला झाला नव्हता. 

अमेरिकेच्या 'कॅपिटॉल' इमारती
भारतात लोकसभा व राज्यसभा ही संसदेचे दोन सभागृह आहेत, त्याप्रमाणे अमेरिकेच्या ‘यूएस कॅपिटॉल’मध्ये काँग्रेसची दोन प्रतिनिधिगृहे आहेत. सर्वांत कडेकोट सुरक्षा असलेल्या ठिकाणांपैकी ही इमारत आहे. याला ‘कॅपिटॉल’ इमारती म्हणतात. याच्या उत्तर भागात ‘सिनेट’ (वरिष्ठ सभागृह) व दक्षिण भागात ‘हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ (कनिष्ठ सभागृह) आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये कॅपिटल हिलवर ही इमारत उभारण्यात आल्याने तिला ‘यूएस कॅपिटॉल’ अशी ओळख मिळाली आहे.

loading image
go to top