H-1B व्हिसाबाबतची नवी नियमावली; स्थानिक अमेरिकी नागरिकांना प्राथमिकता

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 October 2020

होमलँड सेक्युरिटी विभागाने मंगळवारी उच्च कौशल्य असणाऱ्या कामगारांसाठी H-1B व्हिसाची नियमावली जारी केली.

वॉशिंग्टन- राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सरकारने स्थलांतरित व्हिसाबाबतचे नवे नियम जाहीर केले आहेत. नव्या नियमांमुळे अमेरिकी कामगारांना फायदा होईल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. होमलँड सेक्युरिटी विभागाने मंगळवारी उच्च कौशल्य असणाऱ्या कामगारांसाठी H-1B व्हिसाची नियमावली जारी केली. याअंतर्गत 85,000 परदेशी नागरिकांना अमेरिकेत जाता येणार आहे. 

फेडरल न्यायालयाने मागील आठवड्यात H-1B व्हिसावरील बंदी हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ट्रम्प सरकारकडून अधिक निर्बंध लादणारे निमय जाहीर करण्यात आले आहेत. या नियमांना समोर ठेवण्यात आलेले नाही, मात्र यात अमेरिकी कामगारांचे हित प्राधान्याने लक्षात घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

ट्रम्प यांना फेसबुक-ट्विटरचा दणका; कोरोनाला हलक्यात घेण्याची केली चूक

अमेरिकीत कंपन्यांना आता देशाबाहेरील कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याआधी स्थानिकांचा विचार करावा लागणार आहे. त्यांना अधिक चांगली ऑफर द्यावी लागणार आहे. नवे नियम 60 दिवसानंतर अंमलात येऊ शकतात. सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्या परदेशातून मोठ्या प्रमाणात इंजिनीअरची आयात करत असतात. यातील अनेक इंजिनीअर भारतातून येतात. त्यामुळे याचा फटका जास्त भारतीयांना बसणार आहे. शिवाय सॅलरीमध्येही कमात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  

आपल्याला अमेरिकेला प्राधान्य द्यायचे आहे. त्यामुळे स्थानिक अमेरिकी कामगारांना मदत होईल यासाठी आपल्याला सर्वकाही करायला हवं, असं होमलँड सेक्युरिटीचे सचिव चाड वॉल्फ म्हणाले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात सॅन फ्रान्सिस्को जिल्हा न्यायमूर्ती जेफ्री व्हाईट यांनी H-1B कार्यक्रम बंद करण्याच्या योजनेला केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर मंगळवारी ट्रम्प सरकारने H-1B व्हिसाबाबत नवे कठोर नियम आणून आपला हेतू दुसऱ्या पद्धतीने साध्य केला असल्याचं बोलंल जातंय.

दिलासादायक! देशातील कोरोनाचा प्रभाव होतोय कमी

काय आहे पार्श्वभूमी?

भारतातून आयटी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर तरुण अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने जातात. अशांसाठी अमेरिकेकडून H-1B  व्हिसा सुविधा पुरवण्यात येते. ही सुविधा संबंधित व्यक्तीसह त्याच्या कुटुंबियांनाही लागू असते. या व्हिसावर बाहेरील देशातून मोठ्या प्रमाणवर तरुण अमेरिकेत दाखल झाल्यामुळं स्थानिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत असल्याचा आरोप झाल्यानंतर ट्रम्प यांनी स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा उचलून धरला आहे.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Unveils New H-1B Visa Rule, To Make Sure American Workers Put First